निकालपत्र :- (दि.30/07/2011) ( श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष)
(01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.4 ते 12 व 14 यांना नोटीस लागू हे वकीलांमार्फत हजर झाले व परंतु त्यांना संधी देऊनही त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. सामनेवाला क्र. 3 व 13 यांनी नोटीस न स्विकारलेने त्यांचे नोटीसचे लखोटे सदर कामी दाखल आहे. सदर सामनेवाला हे प्रस्तुत कामी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले म्हणणेही दाखल केलेले नाही. सामनेवाला क्र.2 व 15 हे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. सुनावणीचे वेळेस तक्रारदाराने स्वत: युक्तीवाद केला.
(02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- यातील तक्रारदार यांनी सामनेवाला संस्थेमध्ये खालीलप्रमाणे ठेवी ठेवल्या होत्या.
अ. क्र. | तक्रारदाराचे नांव | ठेव पावती क्र. | ठेव ठेवलेची तारीख | मुदत संपलेची तारीख | ठेव रक्कम | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
01 | श्रीमंत ल.कोळी | 22067 | 24/05/04 | 24/05/11 | 10,000/- | 20,000/- |
02 | श्रीमंत ल.कोळी | 25386 | 07/10/05 | 07/04/13 | 10,000/- | 20,000/- |
03 | श्रीमंत ल.कोळी | 22068 | 24/05/04 | 24/05/11 | 10,000/- | 20,000/- |
04 | शारदा श्री.कोळी | 22069 | 24/05/04 | 24/05/11 | 3,000/- | 6,000/- |
05 | रामगोंडा श्रीकोळी | 19221 | 05/05/03 | 05/05/09 | 9,500/- | 19,000/- |
06 | रामगोंडाश्री. कोळी | 2407 | 08/05/00 | 08/05/10 | 5,000/- | 25,000/- |
07 | कु.महादेवीश्री.कोळीअपाक श्रीमंत लक्ष्मण कोळी | 19222 | 05/05/03 | 05/05209 | 8,800/- | 17,600/- |
कु. महादेवी श्रीमंत कोळी यांचे नांवे त्यांचे वडील श्री श्रीमंत लक्ष्मण कोळी यांनी ठेवलेली असून कु. महादेवी श्रीमंत कोळी या दि.29/01/2010 रोजी जयसिंगपूर येथे मयत झालेल्या आहेत.
यातील सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.2 पत संस्थेचे पालक अधिकारी असून सामनेवाला क्र.3 हे चेअरमन व सामनेवाला क्र.4 हे व्हा.चेअरमन व सामनेवाला क्र.14 हे जनरल मॅनेजर म्हणून काम पाहतात व सामनेवाला क्र. 5 ते 13 हे संचालक म्हणून काम पाहतात.
तक्रारदार यांनी वर नमुद केलेल्या ठेव पावत्यांची रक्कम त्यांचे प्रापंचीक अडचणीमुळे मागणी केली असता सामनेवाला यांनी सदर ठेवींच्या रक्कमा परत देणेसाठी टाळटाळ केली. ज्या ठेवींच्या मुदत संपलेली आहे त्यांची रक्कमसुध्दा दिलेली नाही.
तक्रारदार क्र.1 व 2 यांची मुलगी कु.महादेवी ही अतिशय गंभीर आजारी असताना तक्रारदार यांनी सामनेवालांकडे वारंवार प्रत्यक्ष भेटून ठेव पावत्यांच्या रक्कामांची मागणी केली. परंतु सामनेवाला यांनी कोणतीही अगर कसलीही रक्कम दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदार त्यांचे मुलीवर योग्य ते उपचार करु शकले नाहीत. परिणामी तक्रारदार यांची मुलगी कु.महादेवी श्रीमंत कोळी ही दि.29/01/2010 रोजी मयत झाली. शेवटी तक्रारदार यांनी दि.24/05/2010 रोजी वकील रतनकुमार भिमराव हुडेद यांचे मार्फत रजि.पोष्टाने व यु.पी.सी.ने नोटीस पाठवून ठेवींच्या रक्कमांची मागणी केलेली आहे. सदरची नोटीस मिळूनही सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या ठेवीच्या रक्कमा अदा केलेल्या नाहीत. सामनेवालांचे बेजबाबदार वर्तनामुळे तक्रारदारास त्यांची मुलगीला मुकावे लागले. तक्रारदार यांचे कधीही भरुन न येणारे नुकसान झालेले आहे. त्यामुळे तक्रारदारास सदरचा तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारदारांच्या ठेवीच्या रक्कमा व्याजासह मिळव्यात तसेच सदर ठेव रक्कमेवर संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.20 टक्के व्याज मिळावे. शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारदाराची मुलगी कु.महादेवी हिच्या मुत्यूमुळे झालेल्या नुकसानीपोटी व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,50,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदारांनी सदर मंचास केली आहे.
(03) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्यांच्या प्रती, कु.महादेवी श्री.कोळी हिेचे मृत्यूचे प्रमाणपत्र, वकीलांमार्फत सामनेवाला यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस, सदर नोटीस सामनेवालांना पाठवल्याच्या पोष्टाच्या रिसीट, पोहोच पावत्या, व यु.पी.सी.पावती इत्यादी कागदपत्रे जोडलेली आहेत.
(04) सामनेवाला क्र.2 व 15 यांनी दिलेल्या एकत्रित म्हणणेमध्ये तक्रारदाराचे ठेवीच्या रक्कमा वगळता इतर मजकूर नाकारलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराची मुलगी आजारी असताना ठेवीच्या रक्कमा देणेबाबत जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहेत. परंतु सामनेवाला यांना तक्रारदार यांची रक्कम देता आली नाही. तक्रारदाराने 20 टक्के व्याजासह केलेली मागणी चुकीची व बेकायदेशीर आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
(05) सामनेवाला क्र. 2 व 15 यांनी त्यांचे लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्रे दाखल केलेला नाही.
(06) सामनेवाला क्र.4 ते 12 व 14 यांना नोटीस लागू हे वकीलांमार्फत हजर झाले व परंतु त्यांना संधी देऊनही त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. सामनेवाला क्र. 3 व 13 यांनी नोटीस न स्विकारलेने त्यांचे नोटीसचे लखोटे सदर कामी दाखल आहे. सदर सामनेवाला हे प्रस्तुत कामी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले म्हणणेही दाखल केलेले नाही.
(07) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे व उपलब्ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेमध्ये मुदत बंद ठेव व दशकपूर्ती ठेव योजनेखाली रक्कम ठेवली आहे. त्यातील काही ठेवींची मुदत संपलेली आहे व तरी काही ठेवींच्या मुदती संपलेल्या नाहीत. सदर ठेवींच्या रक्कमेची मागणी करुनही सामनेवाला यांनी ठेव रक्कम व्याजासह दिलेली नाही. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे मुदत बंद व दशकपूर्ती ठेव रक्कम ठेवली आहे व दि.24/05/2010 रोजी नोंद पोच डाकेने नोटीस पाठवून मागणी केली आहे व मागणी करुनही सदर रक्कम सामनेवाला संस्थेने दिलेली नाही.
(08) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सर्व ठेव पावत्या या दामदुप्पट ठेवींच्या असून तक्रारदारांनी सदर ठेव रक्कमेची मुदतपूर्व मागणी केलेचे स्पष्ट होते. परंतु ठेव पावती क्र.22067, 22068, 22069, 19221, 2407, 19222 या ठेव पावत्यांच्या मुदती संपलेल्या असलेने सदर ठेव पावती वरील मुदतपूर्ण रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर मुदत संपलेतारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होर्इपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच ठेव पावती क्र.25386 ची मुदत अ़द्याप पूर्ण झालेली नाही असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर मुदत पूर्ण न झालेल्या ठेव पावतीची रक्कम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सदर ठेव पावतीची वकीलामार्फत प्रथम मागणी केलेल्या दि.24/05/2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या रिझर्व बँकेच्या प्रचलित व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का वजा जाता होणा-या व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(09) सदर ठेव रक्कमा व्याजासह देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.2 संस्थेची येत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.1 व 3 ते 15 यांची वैयक्तिक जबाबदारी रक्कम देणेबाबत आहे असे तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत कथन केले आहे. परंतु, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, कलम 73 (ए) व (बी), कलम 78, 88 यातील तरतुदीचा विचार केला असता संस्थेच्या कामकाजासंदर्भात वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणेबाबतचे अधिकार सहकार निबंधकांना आहेत. याचा विचार करता तक्रारदारांनी प्रस्तुत सामनेवाला यांची त्याप्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली आहे, तसेच, सामनेवाला संस्थेचे ऑडीट होवून सदर सामनेवाला यांचे सदर कलम 88 प्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.1 व 3 ते 15 यांची ठेव रक्कम व्याजासह देणेबाबत वैयक्तिक जबाबदारी येत आहे याबाबतचा तक्रारदारांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद हे मंच फेटाळत आहे. परंतु, ठेव रक्कमा व्याजासह देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.2 संस्थेची येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्हणून मा.ना.उच्च न्यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांनी रिट पिटीशन नं.5223/2009 - सौ.वर्षा रविंद्र देसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी वगैरे - आदेश दि.22.12.2010 याचा आधार हे मंच घेत आहे. सदर पूर्वाधारातील महत्त्वाचा मुद्दा खालीलप्रमाणे :-
“The complaint can be instituted against the society before the Consumer Forum by a depositor or a member of the society and a relief can also be granted as against the society. However, so far as members of the managing committee/directors are concerned, they stand on a different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra Co-operative Society Act, 1960 is followed and unless the liability is fixed against them, they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.”
(10) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदरची पावात्या हया दामदुप्पट ठेवींच्या असून त्यातील काही ठेवींची मुदत संपलेली आहे असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर मुदत संपलेल्या दामदुप्पट ठेव पावती क्र. क्र.22067, 22068, 22069, 19221, 2407, 19222 वरील मुदतपूर्ण रक्कमा मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत, तसेच ठेव पावती क्र.25386 ची मुदत पूर्ण न झालेने सदर ठेव पावतीची रक्कम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सदर ठेव पावत्यांची वकीलामार्फत प्रथम मागणी केलेल्या दि.24/05/2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या रिझर्व बँकेच्या प्रचलित व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का वजा जाता होणा-या व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(11) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
(2) सामनेवाला क्र.2 संस्थेने तक्रारदारास खालील दामदुप्पट ठेव पावत्यांवरील मुदतपूर्ण रक्कमा अदा कराव्यात. सदर रक्कमांवर मुदत संपलेतारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे.
अ. क्र. | तक्रारदाराचे नांव | ठेव पावती क्र. | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
01 | श्रीमंत ल.कोळी | 22067 | 20,000/- |
02 | श्रीमंत ल.कोळी | 22068 | 20,000/- |
03 | शारदा श्री.कोळी | 22069 | 6,000/- |
04 | रामगोंडा श्रीकोळी | 19221 | 19,000/- |
05 | रामगोंडाश्री. कोळी | 2407 | 25,000/- |
06 | कु.महादेवीश्री.कोळीअपाक श्रीमंत लक्ष्मण कोळी | 19222 | 17,600/- |
(03) सामनेवाला क्र.2 संस्थेने तक्रारदारास ठेव पावती क्र.25386 वरील रक्कम अदा करावी. सदर रक्कमेवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वकीलामार्फत प्रथम मागणी केलेल्या दि.24/05/2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या रिझर्व बँकेच्या प्रचलित व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का वजा जाता होणा-या व्याजासह रक्कम अदा करावी. दि.24/05/2010 नंतर सदर रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे.
(04) सामनेवाला क्र.2 संस्थेने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रुपये 1000/-(रु.एक हजार फक्त) द्यावा.