तक्रारदार : स्वतः वकील श्री.मल्होत्रा सोबत हजर.
सा.वाले : गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.एस.डी. मडके , अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. तक्रारदार यांनी, फेब्रुवारी-मार्च 2014 दरम्यान दै. महाराष्ट्र टाइम्स व दै. सामना या वर्तमानपत्रात सामनेवाला यांच्या उपचार केंद्राची जाहीरात वाचली. सदर जाहीरातीमध्ये सांधे, कंबर, मान, पाठीचा कणा इत्यादी दूखण्यावर विशीष्ट प्रकारच्या ट्रीटमेंटने त्वरीत आराम मिळेल असे नमुद असल्याने तक्रारदारांनी उपचार घेण्याचे ठरवले.
2. तक्रारदार यांनी परि.क्र. 5 मध्ये नमूद केले की, मार्च 2014 मध्ये ते उपचार केंद्रात गेले असता त्यांचा आजार 100 टक्के बरा होईल अशी ग्वाही दिली. सदर उपचारासाठी रु.1,25,000/- खर्च असून VAX D चा उपचार घ्यावा लागेल असे सांगितले. सदर जाहीरात व सा.वाले यांनी दिलेल्या अश्वासनामुळे त्यांनी दिनांक 10.4.2014 रोजी रक्कम दिली.
3. तक्रारदार यांच्यावर दिनांक 1.4.2014 पासून चार आठवडे VAX D ट्रीटमेंट करण्यात आली. सा.वाले यांच्या म्हणण्याप्रमाणे योग्य सूचना पाळल्या व काळजी घेतली. सदर उपचारामुळे तक्रारदार यांच्या आजारावर व दुखण्यावर किंचीतही आराम मिळाला नाही. उलट मान,कंबर, खांदा, इत्यादी दुखण्याचे प्रमाण वाढले.
4. तक्रारदार यांनी सा.वाले यांचे प्रतिनिधी श्री. दिनेश दळवी यांना लेखी पत्राव्दारे विनंती केली की, सदर उपचारामुळे फरक पडला नसल्याने उपचारापोटी घेतलेली रक्कम परत मिळावी. तक्रारदार यांनी उपचार घेतल्यापासून सतत भेटून, फोन करुन, पत्रव्यवहार करुनही, कोणतीही उपययोजना न करता परत ट्रीटमेंट घेण्यास सांगीतले.
5. तक्रारदार यांनी म्हटले की, सा.वाले यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी केली असून सदर रक्कम परत मिळणेसाठी व आर्थिक व मानसीक त्रासापोटी एकूण रु.2,50,000/- ची मागणी केली आहे.
6. सा.वाले यांनी आपले म्हणणे दाखल करुन तक्रार अर्जातील मजकूर पूर्णतः नाकारला. त्यांनी नमूद केले की, त्वरीत आराम मिळेल अशी ओळ जाहीरातीमध्ये नाही. तसेच 100 टक्के आजार बरा होतो असे नमूद नाही. तक्रारदार यांना उपचार करण्यापूर्वी मणक्याची स्थिती या बद्दल रिपोर्टवरुन सांगीतले होते व VAX D उपचाराबद्दल सांगितले होते.
7. सा.वाले यांनी नमुद केले की, तक्रारदार यांना कन्सेंट फॉर्म समजावून सांगितला होता. त्यावर त्यांनी स्वखुषीने सही केली. तक्रारदार यांना उपचार सुरु करण्यापूर्वी व उपचारा दरम्यान, काय काळजी घ्यायची या बद्दल नियमावली देण्यात आली होती. तक्रारदार सांगुनसुध्दा कंबरेच्या उपचारा दरम्यान अधून मधून येत नसत.
8. सा.वाले यांनी कथन केले की, तक्रारदार यांनी मानेची व कंबरेची दोन्ही उपचार व्यवस्थित पूर्ण केले नाही. बहुतेक वेळा ते रात्रपाळी करुन सकाळी उपचारासाठी येत असत व डॉक्टरांनी सांगितलेला प्रोटोकॉल पूर्णपणे पाळला नाही.
9. सा.वाले म्हणतात की, उपचाराचे शुल्क उपचारानंतर परत केले जाणार नाही असे नमूद केले आहे. वाचण्याची संधी न देता स्वाक्षरी घेतली हे नाकारले आहे. तक्रारदार यांनी दिनेश दळवी यांना मानसीक त्रास देण्यासाठी खोटी तक्रार दाखल केली आहे.
10. प्रस्तुत प्रकरणी उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी सा.वाले यांची जाहीरात वाचुन उपचार करण्याचा निर्णय घेतला व सामनेवाला यांना रु.1,25,000/- एवढी रक्कम दिली.
11. सदर जाहीरातीमध्ये ना दवाई, ना इंजेक्शन, ना ऑपरेशन, ना अस्तपाल मे रहना व ना कोई साईड इन्फेक्शन असा मजकूर आहे. सदर जाहीरात ही गर्दन और कमर के दर्द से मुक्ती या संबंधी आहे.
12. दोन्ही बाजुंनी मान्य केले की, कांही दिवस स्ट्रीटमेंट सा.वाला यांनी तक्रारदार यांना दिली. सदर ट्रीटमेंट Lumbar treatment व Cervical treatment संबंधी असुन, सा.वाले यांनी मान्य केले की, तक्रारदार कंबरेच्या उपचारा दरम्यान आठ दिवस उपचारासाठी न आल्याने उपचार केला नाही.
13. सा.वाले यांनी मान्य केले की, तक्रारदार यांची मानेची पूर्ण ट्रीटमेंट दिली नाही. सा.वाले यांनी स्पष्टपणे मान्य केले की, तक्रारदार यांची कंबरेची व मानेची दोन्ही ट्रीटमेंट व्यवस्थित पूर्ण केली नाही.
14. सा.वाले यांनी मान्य केले की, तक्रारदार यांनी कंबरेचे व मानेचे उपचार पूर्णपणे न घेऊनही कांही प्रमाणात बरे वाटले.
15. दाखल पुराव्यावरुन असे दिसून येते की, तक्रारदार यांनी सा.वाले यांच्या म्हणण्यानुसार व बरे होण्याच्या आश्वासनानुसार दिनांक 1.4.2014 रोजी रु.1,25,000/- ( रुपये एक लाख पंचवीस हजर फक्त) सा.वाले यांना दिले. परंतु तक्रारदार यांना पूर्ण उपचार मिळाले नाहीत व आजार बरा झाला नाही.
16. तक्रारदार यांनी शपथेवर सांगीतले की, VAX D उपचार घेऊनही आजारात फरक जाणवला नाही. तक्रारदार यांना मान, खांदा, कंबरेत प्रचंड वेदना होतात.
17. सा.वाले यांनी येवढी रक्कम स्विकारुन, आपण योग्य उपचार केले असा पुरावा दाखल न करता तक्रारदारांना पूर्ण उपचार मिळाले नाही व आजार बरा झाला नाही असे मान्य केले.
18. मंचाच्या मते, तक्रारदार यांनी कांही प्रमाणात उपचार घेतले व
ब-याच प्रमाणात उपचार न मिळाल्याने सा.वाला यांनी तक्रारदार यांना 60 टक्के फीस परत करावी व 40 टक्के फीस झालेल्या उपचारासाठी घ्यावेत.
19. सा.वाले यांनी तक्रारदार यांचे कडून संपूर्ण फीस घेऊन त्यांना उपचारा संबंधी विश्वासात घेऊन, पूर्ण उपचार न करणे ही सेवेतील त्रुटी आहे.
20. मंच न्यायाचे दृष्टीने पुढील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 30/2016 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सा.वाले यांनी तक्रारदार यांना रु.75,000/- (रुपये पंचाहस्तर हजार फक्त) द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने आदेशाच्या दिनांपासून पूर्ण पैसे देइपर्यत
द्यावेत.
- खर्चा संबंधी आदेश नाहीत.
- आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 19/12/2017