न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
मौजे कसबा करवीर, ता. करवीर येथील श्रीराम कॉलनी, साने गुरुजी वसाहत मधील रि.स.नं. 1009/1 प्लॉट नं.4 याचे 7/12 उतारा प्रमाणे एकूण क्षेत्र हे.0-03-06-32 आर असून ही मिळकत श्री विजय रामचंद्र खेडकर व श्री संदीप कृष्णाजी शेटके यांचेमध्ये ½ हिस्सेप्रमाणे समाईकातील वहिवाटीची आहे. सदर मिळकतीपैकी तक्रारदार यांचे मालकीचे दक्षिण बाजूचे ½ हिस्सेमध्ये वि.प. यांनी बांधकाम व्यावसायिक या नात्याने बांधकाम पूर्ण करणेकरिता लिहून दिलेला दि. 3/7/2020 रोजीचा करार हा तक्रारअर्जाचा विषय आहे. तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये दि. 3/7/2020 रोजी नोटरी दस्त अ.क्र.1022/2020 नुसार बांधकामाबाबत करारपत्र झाले आहे. सदरचे करारपत्रानुसार वि.प. यांनी दि. 23/7/2020 पासून बांधकाम सुरु करावयाचे होते व संपूर्ण बांधकाम 5 महिन्यात पूर्ण करुन देणेचे होते व त्याकरिता मोबदला रक्कम रु. 16,25,000/- इतका स्टेजवाईज अदा करणेचा होता. त्यानुसार तक्रारदारांनी वि.प. यांना रक्कम रु.16,00,000/- अदा केलेली आहे. परंतु ठरलेप्रमणे दि. 24/12/2020 पर्यंत वि.प. यांनी बांधकाम पूर्ण करुन दिलेले नाही. म्हणून तक्रारदारांनी दि. 18/4/2021 रोजी वि.प. यांना पत्र पाठवून कळविले की, नमूद वेळेत बांधकाम पूर्ण न केलेने तक्रारदार यांना चार महिनेचे घरभाडे द्यावे व बांधकामाचे लाईट व पाणी बिल भरावे लागत असलेने उर्वरीत बांधकाम पूर्ण करुन घराचा ताबा द्यावा. सदर पत्रास वि.प. यांनी दि. 27/4/2021 रोजी प्रतीउत्तर पाठवून दिलगिरी व्यक्त केली. तसेच बांधकाम पूर्ण न होणेचे कारण म्हणून त्यांचे सहकारी श्री पाखरे यांचे कारण पुढे केले. तदनंतर लॉकडाऊनचे कारण पुढे करुन वि.प. हे बांधकाम पूर्ण करण्यास टाळाटाळ करु लागले. म्हणून तक्रारदारांनी दि. 1/5/2021 रोजी व पुन्हा दि. 20/7/2021 रोजी वि.प. यांन वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु त्यास वि.प. यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून येणे असलेल्या रकमेचा सविस्तर तपशील तक्रारअर्जात नमूद केला आहे. त्यानुसार तक्रारदार यांना वि.प. यांचेकडून रक्कम रु. 5,50,500/- इतकी रक्कम येणे आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून अपु-या बांधकामापोटी येणे असलेली रक्कम रु.5,50,500/-, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.30,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत नोटरी करारपत्र, तक्रारदार यांनी पाठविलेली पत्रे, तक्रारदारांनी पाठविलेल्या नोटीसा, तक्रारदार यांनी केलेला भाडेकरार वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
4. प्रस्तुत कामी वि.प. यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प. हे याकामी गैरहजर राहिलेने वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून अपु-या बांधकामापोटी रक्कम परत मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये दि. 3/7/2020 रोजी नोटरी दस्त अ.क्र.1022/2020 नुसार तक्रारदाराचे घराचे बांधकामाबाबत करारपत्र झाले आहे. सदरचे करारपत्रानुसार वि.प. यांनी दि. 23/7/2020 पासून बांधकाम सुरु करावयाचे होते व संपूर्ण बांधकाम 5 महिन्यात पूर्ण करुन देणेचे होते व त्याकरिता मोबदला रक्कम रु. 16,25,000/- इतका स्टेजवाईज अदा करणेचा होता. त्यानुसार तक्रारदारांनी वि.प. यांना रक्कम रु.16,00,000/- अदा केलेली आहे. तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये झालेले सदरचे नोटरी करारपत्र याकामी तक्रारदाराने दाखल केले आहे. वि.प. यांनी याकामी हजर होवून प्रस्तुत बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, तक्रारदारांनी तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये झालेल्या करारानुसार तक्रारदारांनी वि.प. यांना रक्कम रु.16,00,000/- वेळोवेळी अदा केलेली आहे. परंतु ठरलेप्रमणे दि. 24/12/2020 पर्यंत वि.प. यांनी बांधकाम पूर्ण करुन दिलेले नाही ही बाब तक्रारदाराने शपथेवर दाखल केले पुराव्याच्या शपथपत्रात स्पष्ट केलेली आहे. म्हणून तक्रारदारांनी दि. 18/4/2021 रोजी वि.प. यांना पत्र पाठविले. सदर पत्रास वि.प. यांनी दि. 27/4/2021 रोजी प्रतीउत्तर पाठवून दिलगिरी व्यक्त केली. तसेच बांधकाम पूर्ण न होणेचे कारण म्हणून त्यांचे सहकारी श्री पाखरे यांचे कारण पुढे केले. तदनंतर लॉकडाऊनचे कारण पुढे करुन वि.प. हे बांधकाम पूर्ण करण्यास टाळाटाळ करु लागले. म्हणून तक्रारदारांनी दि. 1/5/2021 रोजी व पुन्हा दि. 20/7/2021 रोजी वि.प. यांन वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु त्यास वि.प. यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून येणे असलेल्या रकमेचा सविस्तर तपशील तक्रारअर्जात नमूद केला आहे. त्यानुसार तक्रारदार यांना वि.प. यांचेकडून रक्कम रु. 5,50,500/- इतकी रक्कम येणे आहे असे तक्रारदाराचे कथन आहे. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतीही कथने वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेली नाहीत. वि.प. यांना तक्रारअर्जाची जाहीर नोटीस लागू होऊनसुध्दा ते याकामी मंचात हजर झाले नाहीत. सबब, वि.प. यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. तक्रारदारांनी याकामी वि.प. यांना पाठविलेली पत्रे तसेच वकीलामार्फत पाठविलेल्या नोटीसींच्या प्रती दाखल केल्या आहेत. सदरचे कागदपत्रांचे अवलोकन करता, वि.प. यांनी तक्रारदारांचे बांधकाम अपूर्ण ठेवले आहे ही बाब शाबीत होते असे या आयोगाचे मत आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून येणे असलेल्या रकमेचा सविस्तर तपशील तक्रारअर्जात नमूद केला आहे. त्यानुसार तक्रारदार यांना वि.प. यांचेकडून रक्कम रु. 5,50,500/- इतकी रक्कम येणे आहे असे तक्रारदाराने केलेले शपथेवरचे कथन आहे. वि.प. यांनी याकामी हजर होवून तक्रारदाराचे सदरचे कथन खोडून काढलेले नाही. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून रक्कम रु.5,50,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदरचे रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष तक्रारदारास मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- अशी रक्कम वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग मंच येत आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.5,50,000/- अदा करावी. तसेच सदरचे रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदारास मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. यांनी तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 71 व 72 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.