Maharashtra

Chandrapur

CC/18/173

Kisan Yenkuji Tembhurne - Complainant(s)

Versus

Alchiemist Township India Limited through Manager - Opp.Party(s)

Adv. Rafika Sheikh

09 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/173
( Date of Filing : 23 Oct 2018 )
 
1. Kisan Yenkuji Tembhurne
Bhangaram Ward Ambedkar Putla Bhadrawati
chandrapur
Maharashtra
2. Sau Kamal Kisan Tembhurne
Bhangaram Ward Chandrpur
chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Alchiemist Township India Limited through Manager
Alchimest House Plot F 5 Rajiv Gandhi IT Park chandighad Panjab
Panjab
Panjab
2. Kanwar Deep Singh Chairman
Alchimest township India Ltd Chandigagha Panjab
chandigagh
Panjab
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 09 Dec 2019
Final Order / Judgement

::: नि का :::

   (मंचाचे निर्णयान्‍वये,  मा. सौ. कल्‍पना जांगडे (कुटे) मा.सदस्‍या)

(पारीत दिनांक :- 9/12/2019)

 

1.   तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांनी त्‍यांचे आममुख्‍त्‍यार श्री. विलास किसन टेंभुर्णे यांचेमार्फत प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे.

 

2.   विरूध्‍द पक्ष क्र.1 व 2 हे टाऊनशिप प्रोजेक्‍ट तयार करून गृहविक्रीचा व्‍यवसाय करतात. त्‍यांच्‍या भारतभर शाखा असून जून,2018 पावेतो चंद्रपूर येथेदेखील त्‍यांचे  शाखा कार्यालय सुरू होते. सदर चंद्रपूर कार्यालयाचे अधिका-यांनी लोकांना सदर कंपनीत आकर्षक प्रलोभनं दाखवून गुंतवणूक करण्‍यांस प्रेरीत केलं व त्‍यांनी दुप्‍पट लाभ देण्‍याची हमी दिल्‍यामुळे तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांनी संयुक्‍तपणे विरूध्‍दपक्ष यांचे एम.आय.एस. योजनेत रक्‍कम रू.3,00,000/- गुंतवले व त्‍यावर विरूध्‍द पक्ष यांनी गुंतवणूक दि. 14/6 2013 पासून सदर रकमेच्‍या परिपक्‍वता तिथी दिनांक14/6/2016 पावेतो दरमहा व्‍याज रू.3,000/- देखील जमा केले. विरूध्‍द पक्ष यांनी दिनांक 5/7/2013 रोजीचे पत्रान्‍वये विरूध्‍द तक्रारकर्त्‍यांस आय.डी.क्र.टी.वाय.00001552 नमूद करून प्रोजेक्‍टसंबंधी माहिती दिली तसेच कंपनीने पार्क एव्‍हेन्‍यु, तलवंडी भाई, तह.झीरा, जि.फिरोजपूर,पंजाब हा हाऊसींग प्रोजेक्‍ट सुरू केला असून आपल्‍या गुंतवणूकीचे रकमेतून सदर प्रोजेक्‍टमधील प्‍लॉट/अपार्टमेंट अॅलॉट केल्‍या जाईल व ही ऑफर मान्‍य नसल्‍यांस विरूध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍यांची रक्‍कम रू.3,00,000/- दिनांक 14/6/2016 रोजी परत करतील असे कळविले. मात्र तक्रारकर्त्‍यांना वरीलप्रमाणे कोणताही प्रस्‍ताव देण्‍यांत आला नाही.त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांनी परिपक्‍वता तिथीनंतर विरूध्‍द पक्ष क्र.1 चे चंद्रपूर शाखा कार्यालयात दिनांक 22/3/2016 रोजी मुळ प्रमाणपत्र जमा करून गुंतवणूकीचे रकमेची मागणी केली. मात्र विरूध्‍द पक्षांनी टाळाटाळीची उत्‍तरे दिली व रक्‍कम परत केली नाही. सबब तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्षांना अधिवक्‍त्‍यामार्फत दिनांक 9/10/2018 रोजी नोटीस दिला, परंतु विरूध्‍द पक्षांना  नोटीस प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे तक्रारकर्त्‍यांनी मंचासमक्ष विरूध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांचेविरूध्‍द तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये अशी मागणी केली आहे की, तक्रारकर्त्‍यांनी आय.डी.क्र.टी.वाय.00001552 अन्‍वये गुंतविलेली रक्‍कम रू.3,00,000/-, व त्‍यावर दिनांक 14/6/2016 पासून रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे.12 टक्‍के दराने व्‍याजासह विरूध्‍द पक्ष क्र.1 व 2 ने तक्रारकर्त्‍यांना द्यावी तसेच मानसीक व शारिरीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.50,000/- व तक्रारीचा खर्च रू.30,000/- विरूध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यांना देण्‍याचे आदेश पारीत करण्‍यांत यावेत अशी विनंती केली.

 

3. तक्रारकर्त्‍यांची तक्रार स्विकृत करुन विरूध्‍द पक्षांविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. इंडिया पोस्‍ट कडून प्राप्‍त ट्रॅक रिपोर्टनुसार विरूध्‍द पक्ष क्र.1 यांना नोटीस प्राप्‍त होऊनही ते मंचासमक्ष उपस्‍थीत झाले नाहीत त्‍यामुळे त्‍यांचेविरूध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश दिनांक 7/11/2019 रोजी नि.क्र.1 वर पारीत करण्‍यांत आला. तसेच विरूध्‍द पक्ष क्र.2 यांचा नोटीस ‘घेण्‍यांस नकार’ या शे-यासह परत आला. त्‍यामुळे वि.प.क्र.2 यांचेविरूध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश दिनांक 8/7/2019 रोजी नि.क्र.1 वर पारीत करण्‍यांत आला.

 

4. तक्रारकर्त्‍यांची तक्रार, दस्‍तावेज, तक्रारकत्‍यांच्या तक्रारीलाच शपथपत्र समजण्‍यात यावे अशी नि.क्र.17 वर पुरसीस दाखल, तसेच तक्रारकर्त्यांचा तोंडी युक्‍तीवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍याबाबतची कारणमिमांसा आणी निष्‍कर्ष पुढील प्रमाणे.

 

 

मुद्दे                                            निष्‍कर्ष

 

1)    तक्रारकर्ता क्र.1 व 2 हे विरूध्‍द पक्षांचे ग्राहक आहेत काय ?:    होय

2)    विरूध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यांप्रति न्‍युनता पूर्ण सेवा दिली आहे

      काय ?                                              होय

     

3)    आदेश काय ?                           :  अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारण मिमांसा

मुद्दा क्रं. 1  बाबत ः- 

5.      तक्रारकर्त्‍यांनी आय.डी.क्र.टी.वाय.00001552 अन्‍वये दिनांक 14/6/2013 रोजी 3 वर्षाकरीता रक्‍कम रू.3,00,000/- विरूध्‍द पक्षांकडे गुंतविलेल्‍याबाबतचा उल्‍लेख असलेले विरूध्‍द पक्षांचे दिनांक 5/7/2013 चे पत्राची  प्रत प्रकरणात नि.क्र.4वर दस्त क्र1वर दाखल केली आहे. या दस्‍तावेजावरून तक्रारकर्ते हे विरूध्‍द पक्षांचे ग्राहक आहेत हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

 

मुद्दा क्रं. 2  बाबत ः- 

6.   वरील मुद्याचे विवरणात नमूद केल्‍यानुसार तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांनी आय.डी.क्र.टी.वाय.00001552 अन्‍वये दिनांक 14/6/2013 रोजी 3 वर्षाकरीता रक्‍कम रू.3,00,000/- विरूध्‍द पक्षांकडे गुंतविले असून विरूध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यांस दिनांक 5/7/2013 रोजीचे पत्रान्‍वये कंपनीने पार्क एव्‍हेन्‍यु, तलवंडी भाई, तह.झीरा, जि.फिरोजपूर,पंजाब हा हाऊसींग प्रोजेक्‍ट सुरू केला असून आपल्‍या गुंतवणूकीचे रकमेतून सदर प्रोजेक्‍टमधील प्‍लॉट/अपार्टमेंट अॅलॉट केल्‍या जाईल व ही ऑफर मान्‍य नसल्‍यांस विरूध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍यांची रक्‍कम रू.3,00,000/- दिनांक 14/6/2016 रोजी परत करतील असे कळविले. मात्र तक्रारकर्त्‍यांना वरीलप्रमाणे कोणताही प्रस्‍ताव देण्‍यांत आला नाही.त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांनी परिपक्‍वता तिथी 14/6/2016 नंतर विरूध्‍द पक्ष क्र.1 चे निर्देशांनुसार त्‍यांचे चंद्रपूर शाखा कार्यालयात दिनांक 22/3/2016 रोजी मुळ प्रमाणपत्र जमा करून सदर पत्रावर मुळ प्रमाणपत्र मिळाल्‍याची पोचपावती लिहून घेतली आणी गुंतवणूकीचे उपरोक्त रकमेची मागणी केली. मात्र त्‍यानंतर विरूध्‍द पक्षांनी रक्‍कम परत न करता सातत्‍याने टाळाटाळीची उत्‍तरे दिली असे तक्रारकर्त्यांनी शपथेवर तक्रारीत नमूद केलेले आहे. मात्र विरूध्‍द पक्षांनी सदर गुंतवणुकीचे रकमेवरील गुंतवणूक दिनांक 14/6/2013 ते परिपक्‍वता दिनांक 14/6/2016 पावेतो प्रतिमाह रू.3,000/- प्रमाणे व्‍याज तक्रारकर्त्‍यांच्‍या खात्‍यात जमा केल्‍याचे कबूल केले आहे. मात्र वारंवार तोंडी तसेच नोटीसद्वारे मागणी करूनही गुंतवणूकीची रक्‍कम विरूध्‍द पक्ष यांनी परत केली नाही असे तक्रारकर्त्‍यांनी शपथेवर नमूद केले आहे. तक्रारकर्त्‍यांचा हा आक्षेप विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारीत उपस्‍थीत राहून खोडून काढलेला नाही तसेच आपल्‍या बचावार्थ कोणतेही म्‍हणणे वा बचाव प्रकरणात दाखल केलेले नाही. अशा परिस्थितीत विरूध्‍द पक्षांनी गुंतवणुकीची मुळ रक्‍कम रू.3,00,000/- परत न करून तक्रारकर्त्‍यांप्रती न्‍युनतापूर्ण सेवा दिल्‍याचे सिध्‍द होत असल्‍याने तक्रारकर्ते हे विरूध्‍द पक्षांकडून गुंतवणुकीची मुळ रक्‍कम परत मिळण्‍यांस तसेच त्‍यांना झालेल्‍या शारिरीक व मानसीक त्रासापोटी उचीत नुकसान भरपाई आणी तक्रारीचा खर्च मिळण्‍यांस पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

 

मुद्दा क्रं. 3 बाबत ः- 

 

7.   मुद्दा क्रं. 1 व 2 च्‍या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

अंतीम आदेश

 

 

    (1) तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र.173/2018 अंशतः मंजूर करण्‍यात येते.

    (2)  विरूध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्‍तीक वा संयुक्‍तरीत्‍या गुंतवणुकीची

         मुळ रक्‍कम रू.3 लाख तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांना परत करावी.

    (3)  विरूध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्‍तीक वा संयुक्‍तरीत्‍या शारिरीक व

         मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम रू.10,000/- आणी

         तक्रारीच्‍या खर्चापोटी रू.5,000/- तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांना द्यावेत.

    (4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी .

 

 

 

                             

(श्रीमती कल्‍पना जांगडे(कुटे))  (श्रीमती किर्ती वैदय (गाडगीळ))  ( श्री.अतुल डी. आळशी)                     

      सदस्‍या                     सदस्‍या                      अध्‍यक्ष 

                जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.