(मंचाचे निर्णयान्वये, रत्नाकर ल.बोमीडवार, सदस्य)
(पारीत दिनांक : 9 एप्रिल 2009)
... 2 ...
... 2 ...
1. अर्जदाराने, सदर तक्रार, गैरअर्जदार शाखा अधिकारी, दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., गडचिरोली, शाखा आरमोरी व श्री मनोज अभिमन्यु वंजारी, अधिकृत प्रतिनिधी, दै ठेव बचत दि. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. शाखा अरमोरी यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे.
2. अर्जदाराचे दैनिक गृहलक्ष्मी बचत ठेव या योजनेअंतर्गत पासबुकात असलेले 55630/- व त्यावर व्याज सहीत वसुली मिळणे आहे.
3. अर्जदार, गैरअर्जदार क्र. 1 ची खातेदार असून, गैरअर्जदार क्र. 2 हा, गैरअर्जदार क्र. 1 चा अधिकृत प्रतिनिधी आहे. गैरअर्जदार क्र. 1 हा गैरअर्जदार क्र. 2 चे वतीने खातेदाराकडून दैनिक गृहलक्ष्मी ठेवीची रक्कम गोळा करण्याचा व्यवसाय करतात. वर्षा अखेर खातेदाराला सदर योजने नुसार ठरवून दिलेल्या व्याजांसह एकमुस्त रक्कम परत करण्याचा व्यवसाय करीत आहे.
4. अर्जदाराला जुलै 2007 मध्ये, गैरअर्जदार क्र. 1 कडे दैनिक गृहलक्ष्मी बचत ठेव अंतर्गत सदर योजनेचे दैनिक ठेवीचे पासबुक गैरअर्जदार क्र. 1 च्या सही शिक्यानिशी दिनांक 25 जुलै 2007 ला मिळाले. सदर पासबुक 1 वर्षाच्या मुदतीकरीता होते. त्याचा दैनिक खाता क्र. 2749 हा आहे. त्यानुसार, दिनांक 13/7/2007 पासून दिनांक 16/5/2008 पर्यंत गैरअर्जदार क्र. 1 कडे अधिकृत प्रतिनिधी म्हणून गैरअर्जदार क्र. 2 चे वतीने रक्कम जमा करीत होते. त्यानुसार, अर्जदाराकडे, गैरअर्जदारांनी प्रदान केलेल्या पासबुकात जमा केलेल्या रकमेची नोंद करुन प्रत्येक महिन्याचे शेवटी गैरअर्जदार क्र. 2 अर्जदाराकडून पासबुक घेवून जाऊन गैरअर्जदार क्र. 1 कडे महिन्याचे शेवटी जमा झालेल्या रकमांची बेरीज करुन आणीत होते व तशी सूचना अर्जदारास देत होते.
... 3 ...
... 3 ...
5. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र. 1 कडे, गैरअर्जदार क्र. 2 च्या वतीने तक्रारीतील विवरणाप्रमाणे जुलै 2007-रुपये 3500/-, ऑगष्ट 2007- रुपये 5420/-, सप्टेंबर 2007- रुपये 4950/-, ऑक्टोंबर 2007-रुपये 4570/-, नोव्हेंबर 2007- रुपये 4300/-, डिसेंबर 2007- रुपये 4780/-, जानेवारी 2008- रुपये 6040/-, फरवरी 2008- रुपये 5880/-, मार्च 2008- रुपये 5580/-, एप्रिल 2008- रुपये 5220/-, मे 2008- रुपये 5390/-, अशी एकुण रुपये 55,630/- जमा केले आहे.
6. त्यानंतर, गैरअर्जदार क्र. 2 दैनिक ठेव रक्कम घेण्यास जुन 2008 पासून आले नाही. त्यामुळे, अर्जदाराने, गैरअर्जदार क्र. 1 ची भेट घेवून गैरअर्जदार क्र. 2 वसुलीसाठी येत नसल्याचे सांगीतले व आमचे पैसे आम्हाला परत करण्याची विनंती केली. तेंव्हा गैरअर्जदार क्र. 1 ने मुदती शिवाय पैसे परत करता येत नाही असे सांगीतले. त्यामुळे, अर्जदाराने, गैरअर्जदार क्र. 1 कडे लेखी अर्ज करुन त्याची प्रत दिनांक 7/6/2008 ला गैरअर्जदार क्र. 1 ला व्यक्तीशः दिली. परंतु, गैरअर्जदार क्र. 1 ने त्याची दखल घेतली नाही व जमा रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. गैरअर्जदार क्र. 2 देखील गावांत मिळत नव्हते.
7. मधल्या कालावधीत अर्जदाराला असे कळले की, दिनांक 8/8/2008 रोजी गैरअर्जदार क्र. 1 ने, गैरअर्जदार क्र. 2 चे विरोधात बँकेच्या पैशाची अफरातफर करुन, दैनिक खातेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे, अर्जदाराला मानसिक धक्का बसला व गैरअर्जदार क्र. 1 देखील उडवा-उडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे, अर्जदाराची, गैरअर्जदार क्र. 1 व 2 आर्थिक, मानसिक व शारिरीक हानी करीत आहे. अर्जदाराने, दैनिक ग्राहकाची बचत ठेव गैरअर्जदार क्र. 1 कडे गैरअर्जदार क्र. 2 चे वतीने दैनिक रक्कम रुपये 55,630/- जमा केले, जे व्याजासहित अर्जदाराला गैरअर्जदारांकडून देणे आहे. त्यासंदर्भात, अर्जदाराने आपले वकीलामार्फत दिनांक 9/9/2008 ला कायदेशिर नोटीस पाठविला, परंतु, गैरअर्जदार क्र. 1 ने कोणतीही दखल घेतली नाही व गैरअर्जदार क्र. 2 ने जाणून-बुजून नोटीस स्विकारली नाही.
... 4 ...
... 4 ...
अर्जदाराला मानसिक ञास दिला आहे. अर्जदाराने, 16/5/2008 ला जमा असलेली रक्कम रुपये 55,630/- व त्यावरील प्रचलीत व्याज दरासह व मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासाबद्दल रुपये 40,000/- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडून वसूल करुन देण्याची मागणी केली आहे.
8. अर्जदाराने, आपल्या तक्रारीतील कथनाच्या सत्यतेसाठी निशाणी 4 अ-1, अ-2, अ-3, अ-4, अ-5 नुसार दस्ताऐवज दाखल केले आहे. सदर तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र. 1 हजर झालेत व त्यांनी आपला लेखी उत्तर व विशेष कथन दिले. गैरअर्जदार क्र. 2 सतत गैरहजर होते.
9. गैरअर्जदार क्र. 1 ने आपल्या लेखी बयाणात अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 चे खातेदार व गैरअर्जदार क्र. 2 हे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे अमान्य केले आहे. परंतु, गैरअर्जदार क्र. 1, गैरअर्जदार क्र. 2 चे वतीने खातेदाराकडून दैनिक गृहलक्ष्मी बचत ठेव या योजने अंतर्गत पासबुक देवून खातेदाराकडून दररोज ठेवीचे खातेदाराच्या लायकीनुसार रककम गोळा करण्याचा व्यवसाय करतात व वर्षा अखेरीस खातेदारास सदर योजने नुसार ठरवून दिलेल्या व्याजासह एकमुस्त रक्कम विश्वासाने खातेदारास त्याच्या खात्यातील जमा रक्कम व व्याज परत करण्याचा व्यवसाय करीत आहे, हे मान्य करतात.
10. अर्जदाराला, सदर योजनेचे पासबुक गैरअर्जदार क्र. 1 च्या सही शिक्यानिशी दिनांक 25 जुलै 2007 ला दिले, हे अमान्य आहे व त्याचा क्र. 2749 हा आहे. त्यानुसार, 16/5/2008 पर्यंत अर्जदार क्र. 1 कडे अधिकृत प्रतिनिधी म्हणून गैरअर्जदार क्र. 2 चे वतीने अर्जदार रक्कम भरत होते हे ही त्यांनी अमान्य केले. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र. 1 वर केलेले सर्व आरोप गैरअर्जदाराने अमान्य केले.
11. तसेच, दिनांक 7/6/2008 ला अर्जदाराने, गैरअर्जदार क्र. 1 ला लेखी अर्ज करुन रकमेची मागणी केली हे मान्य नाही.
... 5 ...
... 5 ...
12. अर्जदाराला असे कळले की, दिनांक 8/8/2008 रोजी गैरअर्जदार क्र. 1 नी गैरअर्जदार क्र. 2 चे विरोधात बँकेच्या पैशाची अफरातफर करुन फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली हे मान्य आहे. त्यामुळे, अर्जदाराची मानसिक स्थिती ढासळली हे खोटे आहे.
13. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र. 1 कडे गैरअर्जदार क्र. 2 चे वतीने रुपये 55,630/- जमा केली आहे व सदर रक्कम व्याजासह गैरअर्जदाराकडून देय आहे, हे अमान्य आहे. तसेच, मानसिक ञासाचे रुपये 20,000/- व दाव्याचा खर्च रुपये 20,000/- देण्यास बाध्य नाही. तसेच, अर्जदाराने, दिनांक 9/9/2009 ला कायदेशिर नोटीस पाठवून, गैरअर्जदार क्र. 1 यांनी नोटीस स्विकारुन दखल घेतली नाही, हे अमान्य आहे.
14. यास्तव, गैरअर्जदाराच्या विशेष कथनान्वये अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदारा विरुध्द खारीज करण्यात यावा.
15. गैरअर्जदार विशेष कथनात असे म्हणतात की, गैरअर्जदार क्र. 2 हा या गैरअर्जदाराचा दैनिक गृहलक्ष्मी बचत ठेव अंतर्गत अधिकृत प्रतिनिधी होता. त्यास, पासबुक दिल्यानंतर त्याने इतर ग्राहकाकडून बचत ठेव बाबतचे पैसे जमा करुन या गैरअर्जदारास सदर रक्कम या गैरअर्जदाराकडे जमा करावयास पाहिजे होती. परंतु, ती जमा न केल्याने या गैरअर्जदाराने दिनांक 25/10/07 व 2/1/2008 रोजी पञ देवून ग्राहकाकडून जमा रक्कम शाखा कार्यालयात जमा करावी असे कळविले. परंतु, जमा रकमेचा भरणा केला नाही. गैरअर्जदारास विचारणा केली असता माझे पैसे खर्च झाले असे उत्तर दिले व दिनांक 27/5/2008 ला मला लोकांचे पैसे परत करावयाचे आहे. मला रुपये 3,00,000/- चे कर्ज देण्यात यावे असा अर्ज दिला. पैशाची अफरातफर झाल्याचे लक्षात येताच, गैरअर्जदार क्र. 1 ने पोलीस स्टेशन, आरमोरी येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम 408 व 420 अन्वये गुन्हा क्र. 0052/08 अन्वये गुन्हा दाखल केला. सदर अर्जदाराचे पैसे न देण्यास गैरअर्जदार क्र. 2 हा व्यक्तीशः जबाबदार असून, सदरचा अर्ज या गैरअर्जदाराविरुध्द खर्चासह खारीज करण्यात यावा.
... 6 ...
... 6 ...
16. गैरअर्जदार क्र. 2 सतत गैरहजर राहून एकतर्फा आदेश पारीत करण्याचा निर्णय न्यायमंचाने घेतला.
// कारणे व निष्कर्ष //
17. अर्जदाराने, उपलब्ध करुन दिलेल्या कागदपञानुसार व पासबुका नुसार असे म्हणता येईल की, अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 1 च्या शाखेत रक्कम भरण्यासाठी गैरअर्जदार क्र. 2 ला 13/7/2007 पासून रकमा देत होता, त्याचा खाता क्र. 2749 आहे. त्याने 16/5/2008 पर्यंत रुपये 56,630/- जमा, गैरअर्जदार क्र. 2 कडे जमा केली. गैरअर्जदार क्र. 1 आपल्या बयाणात गैरअर्जदार क्र. 2 हे गैरअर्जदार क्र. 1 चे अधिकृत प्रतिनिधी आहेत हे अमान्य करतात. परंतु, गैरअर्जदार क्र. 1 गैरअर्जदार क्र. 2 च्या वतीने खातेदारांकडून दैनिक गृहलक्ष्मी बचत ठेव या योजने अंतर्गत पासबुक देवून खातेदाराकडून दररोज ठेवीची रक्कम गोळा करण्याचा व वर्षा अखेरीस, जमा रक्कम व व्याज परत करण्याचा व्यवसाय आहे हे मान्य करतात.
18. गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदाराचे सर्व आरोप अमान्य केले आहे. विशेष कथनात गैरअर्जदार क्र. 2 हा गैरअर्जदाराचा दैनिक गृहलक्ष्मी बचत ठेव अंतर्गत अधिकृत प्रतिनिधी होता, त्यास पासबुक दिल्यानंतर त्याने ग्राहकाकडून बचत ठेवीचे पैसे जमा करुन, या गैरअर्जदारास सदर रक्कम जमा करावयास पाहिजे होती, ती जमा न केल्याने दिनांक 20/10/07 व 2/1/08 रोजी पञ देवून रकमेचा भरणा करण्यास सांगीतले. परंतु, भरणा केला नाही. गैरअर्जदार क्र. 2 ने रकमा भरण्यास असमर्थता व्यक्त करीत 27/5/08 ला रुपये 3,00,000/- चे कर्जाची मागणी केली. तेंव्हा, गैरअर्जदार क्र. 1 ला पैशाची अफरातफर झाल्याचे लक्षात येताच, पोलीस स्टेशन, आरमोरी येथे तक्रार नोंदविली व गुन्हा दाखल केला.
19. याचाच अर्थ असा की, गैरअर्जदार क्र. 2 याने अर्जदाराच्या रकमेची अफरातफर केली हे स्पष्ट होते. तसेच, गैरअर्जदार क्र. 2 हा गैरअर्जदार क्र. 1 चा अधिकृत प्रतिनिधी होता, हे देखील स्पष्ट होते.
... 7 ...
... 7 ...
20. गैरअर्जदार क्र. 1 व गैरअर्जदार क्र. 2 ने अर्जदाराची एक प्रकारची फसवणूक केली. गैरअर्जदार क्र. 1 अर्जदाराला जिल्हयातील अग्रेसर बँक असतानांही सेवा पुरविली नाही, हे सिध्द होते, असा न्यायमंचाचा निष्कर्ष आहे.
21. गैरअर्जदार क्र. 2 हा, गैरअर्जदार क्र. 1 चा अधिकृत प्रतिनिधी होता व तो दैनिक गृहलक्ष्मी बचत ठेव अंतर्गत ग्राहकाकडून, गैरअर्जदार क्र. 1 साठी रकमा गोळा करीत होता, हे निश्चीत होते. परंतु, गैरअर्जदार क्र. 1 ने गैरअर्जदार क्र. 2 वर योग्य नियंञण ठेवले नाही. प्रत्येक, महिन्याच्या शेवटी गैरअर्जदार क्र. 2 बँकेत रकमा जमा करतो की, नाही हे पहायचे काम गैरअर्जदार क्र. 1 चे होते, ते त्यांनी काळजीपूर्वक केले नाही. 25 जुलै 2007 ला बँकेने शाखाधिकारी श्रेणी 1, शाखा आरमोरी यांच्या सही शिक्यानिशी अर्जदाराला पासबुक प्रदान (Issue) केले, असे असतांनाही अर्जदार हा ग्राहक नाही, असे गैरअर्जदार क्र. 1 चे म्हणणे गैर आहे. गैरअर्जदार क्र. 2 हा देखील सदर तक्रारीस तेवढाच जबाबदार आहे. त्याने अर्जदाराकडून दररोज रक्कमा गोळा करुन, महिन्याचे शेवटी बँकेत जमा करणे व तसे ग्राहकाला कळविणे आवश्यक होते, परंतु त्याने आपली जबाबदारी पार पाडली नाही व त्याने अर्जदाराच्या पैशाची अफरातफर केली, हे देखील स्पष्ट आहे. या निर्णयाप्रत ग्राहक न्यायमंच आले आहे.
22. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र. 1 व गैरअर्जदार क्र. 2 यांना रक्कम परत करण्याविषयी व झालेली चुक सुधारण्याची वाजवी संधी दिली. परंतु, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी कोणतीही दखल न घेता अतिशय निष्काळजीपणे हे प्रकरण हाताळले. म्हणून सदर तक्रारीतील बाबीस दोघेही जबाबदार आहे, असे ग्राहक न्यायमंचाचे मत आहे. सदर रक्कम गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडेच असल्याचे स्पष्ट होते.
23. वरील विवेचनावरुन अर्जदाराची तक्रार मंजूर करुन, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
... 8 ...
... 8 ...
// अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र. 2 यांनी, अर्जदाराची जमा रक्मम रुपये 56,630/-
दिनांक 20/7/2008 पासून द.सा.द.शे. 6 % व्याजाने, आदेशाची
प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र. 1 यांनी, अर्जदाराला मानसिक व आर्थिक ञासाबद्दल
रुपये 10,000/- (दहा हजार रुपये) आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(4) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने, अर्जदारास तक्रारीचा खर्च रुपये 1,000/-
वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तरित्या, आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(5) गैरअर्जदार क्र. 2 ने, विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास,
आदेशीत रक्कमेवर 9 % टक्के व्याज द्यावे लागेल.
(6) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :–9/4/2009.