Maharashtra

Bhandara

CC/21/52

कल्‍पना बाबुराव बंसोड व इत्‍तर 1 - Complainant(s)

Versus

शाखा व्‍यवस्‍थापक, एस.बी.आय. जनरल इं.कं.लि - Opp.Party(s)

श्री.अमोल भुजाडे

22 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/21/52
( Date of Filing : 14 Jun 2021 )
 
1. कल्‍पना बाबुराव बंसोड व इत्‍तर 1
रा.खतारी.तह.जि.भंडारा
भंडारा
महराष्‍ट्र
2. बाबुराव बुधा बंसोड
रा.खमारी.तह.जि.भंडारा
भंडारा
महराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. शाखा व्‍यवस्‍थापक, एस.बी.आय. जनरल इं.कं.लि
एस.बी.आय.जनरल इं.कं.लि.
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 22 Jul 2022
Final Order / Judgement

                      (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्‍या)

                                                                                        (पारीत दिनांक 22 एप्रिल, 2022)

 

01.  तक्रारदारांनी  प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35 खाली मृतक शुभांगी बन्‍सोड हिचे मृत्‍यू बाबत विमा लाभाची रक्‍कम विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी कडून मिळावी कडून मिळावी व ईतर अनुषंगिक मागण्‍यांसाठी  दाखल केलेली आहे.

 

02.तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

          तक्रारदार क्रं 1 व क्रं 2 हे अनुक्रमे मृतक शुभांगी बुधा बन्‍सोड हिचे आई व वडील असून ते मौजा खमारी, तालुका जिल्‍हा भंडारा येथे राहतात. त्‍यांची मुलगी मृतक शुभांगी बुधा बन्‍सोड (या ठिकाणी जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे स्‍पष्‍ट करणे आवश्‍यक आहे की, मृतक शुभांगी हिचे वडीलांचे नाव बाबुराव असे दिसून येते कारण ते तिचे वडील असल्‍याचा तक्रारीत उल्‍लेख  आहे आणि तिचे वडीलांचे नाव बाबुराव बुधा बन्‍सोड असा आहे, त्‍यामुळे बुधा हे नाव आजोबाचे दिसून येते परंतु तक्रारी मध्‍ये शुभांगी बुधा बन्‍सोड असा उल्‍लेख केलेला आहे, जो चुकीचा दिसून येतो दुसरी महत्‍वाची बाब अशी आहे की, तक्रारी मध्‍ये प्रत्‍येक ठिकाणी बंसोड असे आडनाव दर्शविलेले आहे, त्‍या ऐवजी आम्‍ही निकालपत्रात बन्‍सोड असा उल्‍लेख करीत आहोत)  हिने स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया, शाखा खमारी, तालुका जिल्‍हा भंडारा येथे बचत खाते  दिनांक-24.09.2010 पासून काढले होते आणि सदर खात्‍याचा क्रमांक-31425333506 असा आहे. सदर शाखेचा आय.एफ.सी.कोड क्रं 13529 दिलेला आहे. मृतक शुभांगी बुधा बन्‍सोड हिचे बचत खात्‍यातून विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी कडून रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा काढला होता आणि त्‍यासाठी मृतक शुभांगी हिचे बचत खात्‍यातून दिनांक-18.02.2019 रोजी विमा प्रिमीयम म्‍हणून रुपये-100/- एवढया रकमेची कपात करण्‍यात आली होती आणि त्‍याची नोंद तिचे बचत खात्‍या मध्‍ये झालेली आहे.  सदर विमा पॉलिसी मास्‍टर पॉलिसी असून तिचा क्रमांक-11914225 असून सर्टिफीकेट क्रं-125515923  असा आहे आणि त्‍यावर शुभांगी बन्‍सोड हिचे नाव लिहिलेले असून तिचा बचत खाते क्रं-31425333506 नमुद आहे. सदर विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-18.02.2019 ते दिनांक-17.02.2020 पर्यंत होता आणि सदर विमा पॉलिसी मध्‍ये तक्रारकर्ती क्रं 1 ही नॉमीनी आहे.

 

    तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, त्‍यांची मुलगी शुभांगी बन्‍सोड ही खमारी येथे राहते घरी दिनांक-14.02.2020 रोजी सायंकाळी 7.00 वाजता स्‍वंयपाक करीत असताना अपघाता मुळे जळाली, त्‍यामुळे तिला त्‍वरीत शासकीय रुग्‍णालय, भडारा येथे भरती करण्‍यात आले होते आणि तेथे वैद्दकीय उपचार घेत असताना दिनांक-20.02.2020 रोजी तिचा मृत्‍यू झाला होता. पोलीसांनी फौजदारी प्रक्रिये संहितेच्‍या कलम 174 प्रमाणे दिनांक-24.02.2020 रोजी अप्राकृतीक मृत्‍यू का पंजीकरण अंतर्गत मर्ग नोंदविली,  घटनेच्‍या तपशिलात पोलीसांनी मृतक शुभांगी ही दिनांक-14.02.2020 रोजी अपघाती जळाल्‍याचे आणि त्‍यानंतर ती दिनांक-20.02.2020 रोजी मृत्‍यू पावल्‍याचे नमुद केले. तसेच मृतक शुभांगीचे जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथे शव विच्‍छेदन करण्‍यात आले,  शव विच्‍छेदन अहवाला मध्‍ये ती जळून मृत्‍यू पावल्‍याचे नमुद आहे. शुभांगीचे जन्‍म दाखल्‍या प्रमाणे तिची जन्‍मतारीख-15.07.1992 नमुद आहे तसेच तिचा मृत्‍यूचा दाखला सुध्‍दा प्राप्‍त झालेला आहे.

 

     तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, त्‍यांची मुलगी मृतक शुभांगी बुधा बन्‍सोड हिचे लग्‍न परमेश्‍वर मेश्राम याचेशी झाले असल्‍याने लग्‍ना नंतर तिचे नावात बदल झालेला आहे, त्‍यामुळे मृत्‍यू प्रमाणपत्रा मध्‍ये शुभांगी परमेश्‍वर मेश्राम असे नमुद केलेले आहे परंतु शुभांगी बुधा बन्‍सोड व शुभांगी परमेश्‍वर मेश्राम ही दोन्‍ही नावे एकाच व्‍यक्‍तीची आहेत. विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीला विम्‍याचे हप्‍त्‍याची रक्‍कम मिळालेली असल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष हे सेवा पुरविणारे आहेत. मृतक शुभांगीचा विम्‍याचा कालावधी हा दिनांक-17.02.2020 रोजी संपलेला आहे असे जरी असले तरी  मृतक शुभांगी ही दिनांक-14.02.2020 रोजी अपघाती जळाली आणि तिचा मृत्‍यू दिनांक-20.02.2020 रोजी झालेला आहे. यावरुन असे दिसून येते की, विम्‍याचे वैध कालावधीतच तिचा अपघात झालेला आहे. विरुध्‍दपक्षाने दिनांक-17.06.2020 रोजी व्‍यक्‍तीगत विमा प्रमाणपत्र सुध्‍दा जारी केलेले आहे.तक्रारदारांनी तक्रारीत असे नमुद केले की, तक्रार दाखल करण्‍याचे कारण दिनांक-17.06.2020 रोजी घडले जेंव्‍हा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमाधारक शुभांगी बन्‍सोड हिला पत्र देऊन विमा दावा दाखल केल्‍याची बाब मान्‍य केली, सदर पत्रा मध्‍ये विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने असे नमुद केले की, We regret to note that the Certificate under SBI General Personal Accident Insurance Policy has not yet reached you. We wish to give you following confirmation of your insurance with us.  This is based on information received from your proposal to us.  We request you to verify the information shared to us to ensure it reflects correct detail.  शुभांगी हिचे मृत्‍यू नंतर तक्रारदारांनी वेळोवेळी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी विनंती केली परंतु प्रतिसाद न मिळाल्‍यामुळे तक्रारदार यांनी विरुध्‍दपक्ष यांना दिनांक-18.08.2021 रोजीची कायदेशीर नोटीस पाठवून विमा रकमेची मागणी केली, सदर नोटीस विरुध्‍दपक्षाने दिनांक-18.08.2021 रोजी प्रत्‍यक्ष स्विकारल्‍या नंतरही त्‍यांनी नोटीसला  उत्‍तर दिले नाही व पुर्तता केली नाही त्‍यामुळे तक्रारीस कारण हे सतत घडत आहे.. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिलेली आहे त्‍यामुळे विरुध्‍दपक्षावर दंडात्‍मक कार्यवाही करुन रुपये-50,000/- किंवा त्‍या पेक्षा जास्‍त दंड लादण्‍यात यावा असे नमुद केले. म्‍णून शेवटी त्‍यांनी विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे पुढील मागण्‍या केल्‍यात-

 

  1. मृतक शुभांगीचे अपघाती मृत्‍यूमुळे विमाकृत रक्‍कम रुपये-2,00,000/- सदर तक्रार दाखल केलयाचे दिनांका पासून किंवा मृतक शुभांगी हिचे मृत्‍यू दिनांका पासून 12 टक्‍के व्‍याज दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी यांनी तक्रारकर्ता यांना देण्‍याचे आदेशित व्‍हावे. 

 

  1. सदर  तक्रारीचा खर्च विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी कडून  तक्रारदार यांना देण्‍यात यावा.

 

  1. या शिवाय योग्‍य ती दाद त्‍यांचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.  विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा भंडारा यांचे नाव आणि पत्‍त्‍यावर जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे रजिस्‍टर पोस्‍टाव्‍दारे नोटीस पाठविली असता सदर नोटीस विरुध्‍दपक्ष यांना दिनांक-30.09.2021 रोजी मिळाल्‍या बाबत पोस्‍ट विभागाचा पोस्‍ट ट्रॅक रिपोर्ट अभिलेखावर दाखल आहे परंतु अशी नोटीस मिळाल्‍या नंतरही विरुध्‍दपक्षा तर्फे कोणीही जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्‍यांनी लेखी निवेदन सुध्‍दा दाखल केले नाही म्‍हणून विरुध्‍दपक्षा विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश जिल्‍हा ग्राहक आयोगाने तक्रारी मध्‍ये दिनांक-08.12.2021 रोजी पारीत केला.  

 

 

04   तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज,  तक्रारकर्ती क्रं 1  सौ. कल्‍पना बाबुराव बन्‍सोड यांचा शपथे वरील पुरावा तसेच तक्रारकर्ता क्रं 2 श्री बाबुराव बुधा बन्‍सोड यांचा शपथे वरील पुरावा ईत्‍यादीचे अवलोकन करण्‍यात आले. तक्रारदारां तर्फे वकील श्री अमोल भूजाडे यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

 

अक्रं

मुददा

उत्‍तर

1

मृतक शुभांगी बन्‍सोड हिचे मृत्‍यू पःश्‍चात नॉमीनी  आणि आई या नात्‍याने तक्रारकर्ती क्रं 1  कल्‍पना बाबुराव बन्‍सोड यांना विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीने विम्‍याची रक्‍कम अदा न करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय  ?

-नाही-

 

2

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

 

 

                                                                                                ::निष्‍कर्ष::

मुद्दा क्रं 1 व 2 बाबत

    

05.         मृतक शुभांगी बन्‍सोड हिने स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया, शाखा खमारी, तालुका जिल्‍हा भंडारा येथे बचत खाते  दिनांक-24.09.2010 पासून काढले होते आणि सदर खात्‍याचा क्रमांक-31425333506 असा असून आय.एफ.सी.कोड क्रं 13529 असा असल्‍याची बाब बॅंकेच्‍या खाते पुस्‍तकाच्‍या झेरॉक्‍स वरुन सिध्‍द होते. मृतक शुभांगी बन्‍सोड हिचे बचत खात्‍यातून विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी कडून रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा काढला होता आणि त्‍यासाठी मृतक शुभांगी हिचे बचत खात्‍यातून दिनांक-18.02.2019 रोजी विमा प्रिमीयम म्‍हणून रुपये-100/- एवढया रकमेची कपात करण्‍यात आली होती आणि त्‍याची नोंद तिचे बचत खात्‍या मधून झालेली आहे ही बाब खाते पुस्‍तीके मधील नोंदी वरुन सिध्‍द होते. सदर विमा पॉलिसी मास्‍टर पॉलिसी असून तिचा क्रमांक-11914225 असून सर्टिफीकेट  क्रं-125515923  असा आहे आणि त्‍यावर शुभांगी बन्‍सोड हिचे नाव लिहिलेले असून तिचा बचत खाते क्रं- 31425333506 असे नमुद असून सदर विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-18.02.2019 ते दिनांक-17.02.2020 पर्यंत होता आणि सदर विमा पॉलिसी मध्‍ये तक्रारकर्ती क्रं 1 सौ. कल्‍पना बाबुराव बन्‍सोड ही नॉमीनी आहे त्‍याच बरोबर विमा पॉलिसीची रक्‍कम रुपये-2,00,000/- नमुद आहे असे विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीने मृतक शुभांगी बन्‍सोड हिचे नावे P.A.INSURANCE COVER CINFIRMATION DATED 17/06/2020 प्रमाणपत्रावरुन सिध्‍द होते.   

 

 

06.   तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे त्‍यांची मुलगी शुभांगी बन्‍सोड ही खमारी येथे राहते घरी दिनांक-14.02.2020 रोजी सायंकाळी 7.00 वाजता स्‍वंयपाक करीत असताना अपघातामुळे जळाली, त्‍यामुळे तिला त्‍वरीत शासकीय रुग्‍णालय, भडारा येथे भरती करण्‍यात आले होते आणि तेथे वैद्दकीय उपचार घेत असताना दिनांक-20.02.2020 रोजी तिचा मृत्‍यू झाला होता. पोलीसांनी फौजदारी प्रक्रिये संहितेच्‍या कलम 174 प्रमाणे दिनांक-24.02.2020 रोजी अप्राकृतीक मृत्‍यू का पंजीकरण अंतर्गत मर्ग नोंदविली,  पोलीसांनी घटनेच्‍या तपशिलात मृतक शुभांगी ही दिनांक-14.02.2020 रोजी अपघाती जळाल्‍याचे आणि त्‍यानंतर ती दिनांक-20.02.2020 रोजी मृत्‍यू पावल्‍याचे नमुद केले. तसेच मृतक शुभांगीचे जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथे शव विच्‍छेदन करण्‍यात आले,  शव विच्‍छेदन अहवाला मध्‍ये ती जळून मृत्‍यू पावल्‍याचे नमुद आहे.  या बाबत त्‍यांनी पोलीस दस्‍तऐवज तसेच शवविच्‍छेदन अहवाल त्‍याच बरोबर मृतक शुभांगी हिचा जन्‍मदाखला व मृत्‍यूचा दाखला सुध्‍दा दाखल केलेला आहे, या सर्व दस्‍तऐवजांचे प्रतीवरुन शुभांगीचा जळून मृत्‍यू झाल्‍याची बाब सिध्‍द होते. तक्रारदारांनी असेही नमुद केले की,  शुभांगीचे मृत्‍यू प्रमाणपत्रात शुभांगी परमेश्‍वर मेश्राम असे नमुद केले आहे. मृतक शुभांगी हिचे लग्‍न परमेश्‍वर मेश्राम यांचेशी झालेले असल्‍याने मृत्‍यू प्रमाणपत्रात शुभांगी परमेश्‍वर मेश्राम असे नाव नमुद केलेले आहे.  वस्‍तुतः  शुभांगी बुधा बनसोड व शुभांगी परमेश्‍वर मेश्राम ही दोन्‍ही नावे एकाच व्‍यक्‍तीची आहेत. मृतक शुभांगी बन्‍सोड ही तक्रारकर्ती क्रं 1 सौ. कल्‍पना बाबुराव बन्‍सोड हिची मुलगी असून  तिचे  लग्‍न परमेश्‍वर मेश्राम यांचेशी झालेले असल्‍याने मृत्‍यू प्रमाणपत्रात शुभांगी परमेश्‍वर मेश्राम असे नाव नमुद केलेले आहे परंतु शुभांगी बुधा बन्‍सोड आणि शुभांगी परमेश्‍वर मेश्राम ही दोन्‍ही नावे एकाच व्‍यक्‍तीची आहेत असे शपथे वरील पुराव्‍या मध्‍ये नमुद केलेले आहे.

 

 

07.   तक्रारदारांचे कथना प्रमाणे मृतक शुभांगी बन्‍सोड हिचे मृत्‍यू नंतर वेळोवेळी विनंती करुनही विरुध्‍दपक्षाने विमा रक्‍कम दिलेली नसल्‍याने तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षास त्‍यांचे अधिवक्‍ता श्री अमोल भूजाडे यांचे मार्फतीने कायदेशीर नोटीस दिनांक-18.08.2021 रोजी प्रतयक्ष तामील केल्‍या बाबत विरुध्‍दपक्ष कंपनीचा शिक्‍का सही दिनांकासह दाखल केलेली आहे यावरुन तक्रारदारांचे कथनास बळकटी प्राप्‍त होते. तक्रारदारांनी सदर्हू नोटीसव्‍दारे विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- ची मागणी केली. तक्रारदारांच्‍या आरोपा प्रमाणे विरुध्‍दपक्ष यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍या नंतरही त्‍यांनी नोटीसला उत्‍तर दिले नाही व पुर्तता केलेली नाही.

 

 

08.    जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे विरुध्‍दपक्षांना रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीस मिळूनही ते जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाही व त्‍यांनी आपली बाजू मांडलेली नाही त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष यांचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश प्रकरणात दिनांक-08.12.2021 रोजी पारीत केला.तक्रारदारांची तक्रार सत्‍यापनावर दाखल आहे तसेच दोन्‍ही तक्रारदारांनी आपले कथन शपथे वरील पुराव्‍या व्‍दारे  दाखल केलेले आहे तसेच त्‍यांनी पुराव्‍यार्थ दसतऐवजाच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीने मृतक शुभांगी बन्‍सोड हिचे नावे P.A.INSURANCE COVER CINFIRMATION DATED 17/06/2020 प्रमाणपत्रावरुन मृतक शुभांगी बन्‍सोड हिचा विमा काढल्‍याची बाब तसेच सदर प्रमाणपत्रा मध्‍ये नॉमीनी म्‍हणून मृतक शुभांगी हिची आईचे नाव दर्शविल्‍याची बाब सिध्‍द होते. 

 

 

09.  तक्रारदारांचे वकील श्री अमोल भुजाडे यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष अर्ज करुन प्रस्‍तुत तक्रार दाखल करण्‍याचे कारण दिनांक-17.06.2020 रोजी घडले जेंव्‍हा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमाधारक शुभांगी बन्‍सोड हिला पत्र देऊन विमा दावा दाखल केल्‍याची बाब मान्‍य केली  असा युक्‍तीवाद केला. आम्‍ही  प्रस्‍तुत दिनांक517.06.2020 रोजीचे पत्राचे अवलोकन केले, सदर  दिनांक-17.06.2020 रोजीचे पत्र जे मृतक शुभांगी बन्‍सोड यांचे नावे आहे,  सदर  दिनांक-17.06.2020 रोजीचे पत्रा मध्‍ये विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने असे नमुद केले की, We regret to note that the Certificate under SBI General Personal Accident Insurance Policy has not yet reached you. We wish to give you following confirmation of your insurance with us.  This is based on information received from your proposal to us.  We request you to verify the information shared to us to ensure it reflects correct detail.  दिनांक-17.06.2020 रोजीचे पत्रातील मजकूरा वरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिलेले पत्र जे मृतक शुभांगी बन्‍सोड यांचे नावे आहे,   त्‍यामध्‍ये त्‍यांनी विमा प्रमाणपत्र विहित मुदतीत न पुरविल्‍यामुळे त्‍याव्‍दारे खेद व्‍यक्‍त करुन दिलेली माहिती व्‍हेरीफाय करण्‍याची विनंती केलेली आहे. यावरुन तक्रारदार यांचे वकील श्री अमोल भुजाडे म्‍हणतात की, दिनांक-17.06.2022 रोजीचे पत्र हे दावा नामंजूरीचे पत्र आहे या त्‍यांचे कथनात कोणतेही तथ्‍य जिल्‍हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही.

 

 

10.    दुसरी महत्‍वाची बाब अशी आहे की, मृतक शुभांगी बन्‍सोड हिचे मृत्‍यू नंतर तक्रारदारांनी  विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी मध्‍ये कोणत्‍या तारखेस विमा दावा दाखल केला होता? या बाबत आपले तक्रारी मध्‍ये  तसेच विरुध्‍दपक्षांना दिलेल्‍या नोटीस मध्‍ये कोणताही काहीही उहापोह केलेला नाही किंवा तसा विमा दावा दाखल केल्‍या बाबत कोणताही लेखी पुरावा जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष  दाखल केलेला नाही. परंतु विमा दाव्‍याचे रकमेच्‍या मागणी  संबधात तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीला दिनांक 18.08.2021 रोजी प्रत्‍यक्ष नोटीस तामील केल्‍या बाबत विरुध्‍दपक्ष एस.बी.आय. जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीचा नोटीस मिळाल्‍या बाबत  सही व शिक्‍का पुराव्‍या दाखल सादर केलेला आहे, यावरुन ही बाब सिध्‍द होते की, तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष विमा कंपनी मध्‍ये विमा दावा दाखल न करता सरळसरळ विरुध्‍दपक्षास  नोटीस पाठवून प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.

 

 

11.    जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते जो पर्यंत तक्रारदार विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडे मृतक शुभांगी बन्‍सोड हिचा विमा दावा दाखल करीत नाही आणि असा विमा दावा दाखल केल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष विमा कंपनी त्‍या विमा दाव्‍या संबधाने निर्णय घेत नाहीत तो पर्यंत विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विरुध्‍द जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रस्‍तुत तक्रार  दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडल्‍याचे दिसून येत नाही. तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडे विमा दावा दाखल केल्‍या बाबत कोणताही पुरावा जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष आणलेला नाही, त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार ही अपरिपक्‍व (Premature) असल्‍याने आवश्‍यक निर्देश देऊन परत करणे योग्‍य राहिल,  म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर नकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर नकारार्थी  आल्‍याने मुद्दा क्रं  2   अनुसार तक्रारी मध्‍ये काही निर्देश देऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

 

 

12.   वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीता आहोत-

 

 

                                                                           ::  अंतिम आदेश    ::

 

 

  1. उभय तक्रारदार यांची तक्रार विरुध्‍दपक्ष एस.बी.आय.जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा भंडारा यांचे विरुध्‍दची खालील निर्देशासह परत करण्‍यात येते.

 

 

  1. उभय तक्रारदारांना निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विहित नमुन्‍यातील विमा दावा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष एस.बी.आय.जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी भंडारा यांचे कार्यालयात दाखल करावा व लेखी पोच घ्‍यावी.

 

 

  1.  विरुध्‍दपक्ष एस.बी.आय.जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा भंडारा यांना निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांना तक्रारदारांचा विहित नमुन्‍यातील आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा दावा प्रस्‍ताव मिळाल्‍या नंतर त्‍या विमा दाव्‍या संबधात योग्‍य तो निर्णय विमा दावा प्रस्‍ताव मिळालया पासून एक महिन्‍याचे आत घ्‍यावा.

 

 

  1. तक्रारदारांना विरुध्‍दपक्ष एस.बी.आय.जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा भंडारा यांचे कडे दाखल केलेला विमा दावा नामंजूर झाल्‍यास ते विरुदपक्ष विमा कंपनी विरुध्‍द जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल करु शकतील.

 

 

  1. खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत

 

 

  1. निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

 

  1.    तक्रारदार यांचे तर्फे दाखल अतिरिक्‍त संच त्‍यांना  परत करण्‍यात यावेत.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.