जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 199/2019. तक्रार दाखल दिनांक : 14/06/2019. तक्रार आदेश दिनांक : 13/01/2021. कालावधी: 01 वर्षे 07 महिने 00 दिवस
भारत तुळजीराम खुळे, वय 50 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. भोगलगांव, ता. भुम, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
लि., उस्मानाबाद, शाखा : भुम, ता. भुम, जि. उस्मानाबाद.
(2) सरव्यवस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
उस्मानाबाद, मुख्य शाखा, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (1) श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
(2) श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
(3) श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :- एस.एच. सय्यद
विरुध्द पक्ष यांचेतर्फे प्रतिनिधी
आदेश
1. उभय पक्षांमध्ये दि.25/7/2019 / 20/8/2019 रोजी झालेल्या तडजोड पुरसीसच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांनी पूर्तता करण्यासाठी अंतीम तारीख दि.5/11/2020 नेमण्यात आलेली होती. तडजोड पुरसीसनुसार दि.5/8/2019 ते दि.5/11/2020 पर्यंत एकूण 6 हप्त्यांमध्ये विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना देय रक्कम अदा करण्याची होती.
2. अभिलेखावर दाखल तडजोडपत्राचे अवलोकन केले असता उभय पक्षांमध्ये परस्पर सामंजस्याने व समन्वयाने तडजोड झालेली आहे. तडजोडपत्रावर उभय पक्षांची स्वाक्षरी आहे. असे दिसते की, उभयतांनी अटीदर्शक तडजोडपत्र तयार केलेले आहे. अभिलेखावर दाखल करण्यात आलेल्या खाते उता-याचे अवलोकन केले असता तडजोडपत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे तक्रारकर्ता यांना रक्कम प्राप्त झाल्याचे आढळून येते. वरील अनुषंगाने ग्राहक तक्रार निकाली काढणे न्यायोचित आहे आणि खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्र.199/2019.
आदेश
(1) उभय पक्षांच्या तडजोडपत्रानुसार तक्रार निकाली काढण्यात येते.
(श्री. किशोर द. वडणे)
(श्री. मुकुंद भ. सस्ते) अध्यक्ष (श्री. शशांक श. क्षीरसागर)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-
(संविक/स्व/18121)