जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
अंमलबजावणी अर्ज क्रमांक : 108/2017. अर्ज दाखल दिनांक : 14/11/2017. आदेश दिनांक : 12/10/2020. कालावधी: 02 वर्षे 11 महिने 28 दिवस
सईदाबेगम गुलाम खाजा पटवेकर, वय 40 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. वाशी, ता. वाशी, उस्मानाबाद. तक्रारकर्ती/फिर्यादी
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
उस्मानाबाद, शाखा : वाशी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद.
(2) सरव्यवस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
मुख्य कार्यालय, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष/आरोपी
गणपुर्ती :- (1) श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
(2) श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
तक्रारकर्ती/फिर्यादी यांचेतर्फे विधिज्ञ :- एस.एच. सय्यद
विरुध्द पक्ष/आरोपी यांचेतर्फे प्रतिनिधी
आदेश
1. उभय पक्षांमध्ये मा. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र, औरंगाबाद पिठापुढे प्रथम अपिल क्र. 542/2017 व 543/2017 मध्ये दि.21/12/2017 रोजी झालेल्या तडजोडीनुसार उभय पक्षांमध्ये असणारा वाद संपुष्टात आला. परंतु विरुध्द पक्ष/आरोपी यांच्याद्वारे तक्रारकर्ती/फिर्यादी यांना रु.33,200/- अतिरिक्त अदा केले गेले.
2. आज दि.12/10/2020 रोजी विरुध्द पक्ष/आरोपी यांनी तक्रारकर्ती/फिर्यादी यांच्याकडून रु.33,200/- दि.7/7/2020 जमा केल्याबाबत अर्ज करुन कागदपत्रे दाखल केली आणि प्रकरण निकाली काढण्याची विनंती केली. अशा स्थितीत प्रकरण निकाली काढणे न्यायोचित असून प्रस्तुत अंमलबजावणी अर्ज निकाली काढण्यात येतो.
(श्री. मुकुंद भ. सस्ते) (श्री. किशोर द. वडणे) सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-
(संविक/स्व)