जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 376/2019. तक्रार दाखल दिनांक : 06/12/2019. तक्रार आदेश दिनांक : 06/01/2021. कालावधी: 01 वर्षे 01 महिने 01 दिवस
अरविंद श्रीहरी पोपळे, वय 45 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. डोमगांव, ता. परंडा, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँक लि., उस्मानाबाद, शाखा : सोनारी, ता. भुम, जि. उस्मानाबाद.
(2) व्यवस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
उस्मानाबाद, मुख्य शाखा, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (1) श्री. मुकुंद भगवान सस्ते, जेष्ठ न्यायपीठ सदस्य
(3) श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :- सय्यद एस.एच.
विरुध्द पक्ष यांचेतर्फे प्रतिनिधी
आदेश
श्री. मुकुंद भगवान सस्ते, जेष्ठ न्यायपीठ सदस्य यांचे द्वारे :-
1. तक्रारकर्त्याचे विधिज्ञ गैरहजर. विरुध्द पक्षांचे प्रतिनिधी हजर. उभय पक्षांमध्ये तडजोड झालेली असून तडजोडीच्या दायित्वापोटी आतापर्यंत 2 हप्ते देण्यात आलेले आहेत; शेवटच्या हप्त्याची तारीख 15/7/21 अशी आहे, अशा स्वरुपाची पुरसीस विरुध्द पक्षांच्या प्रतिनिधींनी दाखल केली. सोबत पुराव्याकामी तडजोडीची सत्यप्रत व तक्रारकर्त्यांचा खातेउतारा दाखल केलेला आहे. कागदपत्रांची पडताळणी करुन 2 हप्ते दिले असल्याबाबतची खातरजमा केली. तडजोडीतील अटी व शर्तीस अधीन राहून तक्रार निकाली काढण्यात येते. मात्र तडजोडीनुसार अंमलबजावणी न केल्यास उर्वरीत रकमेसाठी वेगळा 9 टक्के दर हा अधिक व्याजदरासह विरुध्द पक्षासाठी देय राहील. तक्रार निकाली.
(श्री. मुकुंद भ. सस्ते) (श्री. शशांक श. क्षीरसागर)
ज्येष्ठ सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-