जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 52/2019. आदेश दिनांक : 03/06/2022.
मुरलीधर पि. विश्वंभर मस्के, वय 45 वर्षे,
रा. बाभळगांव, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, फॉर्च्यून इंटिग्रेटेड असेटस् फायनान्स लि.,
सिल्व्हर आर्च, नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर, ता. जि. लातूर.
(2) व्यवस्थापक, फॉर्च्यून इंटिग्रेटेड असेटस् फायनान्स लि.,
नमन मिडटाऊन, ए-विंग, 21 वा मजला, सेनापती बापट मार्ग,
एलफिन्स्टोन रोड, मुंबई - 400 013. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- तुकाराम आर. उपाडे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर नाहरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा व नुकसान भरपाई देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रारीची नोंद करण्यात येऊन ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्यात आले. त्यानंतर विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणी होण्याकरिता तक्रारकर्ता यांनी पूर्तता केलेली नाही. तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ सातत्याने अनुपस्थित राहिले. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. उचित संधी देऊनही विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणी करण्याची पूर्तता न केल्यामुळे तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-