जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 188/2019. तक्रार दाखल दिनांक : 06/06/2019. तक्रार आदेश दिनांक : 05/02/2021. कालावधी: 01 वर्षे 08 महिने 00 दिवस
श्री. संदीप देविदास कुलकर्णी, वय 50 वर्षे,
व्यवसाय : नोकरी (खाजगी), रा. जागजी, ता. जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापकीय संचालक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,
उस्मानाबाद, मुख्य कार्यालय, उस्मानाबाद.
(2) मॅनेजर, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,
उस्मानाबाद, शाखा : जागजी, ता. जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (1) श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
(2) श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :- सारंग श्रीकांत वडगांवकर
विरुध्द पक्ष यांचेतर्फे प्रतिनिधी
आदेश
1. उभय पक्षांमध्ये दि.3/2/2020 रोजी झालेल्या तडजोड पुरसीसचे अवलोकन केले असता विरुध्द पक्ष यांनी पूर्तता करण्याची अंतीम तारीख दि.3/12/2021 आहे. तडजोड पुरसीसनुसार विरुध्द पक्ष यांनी दि. 3/3/2020 ते दि. 3/12/2021 या कालावधीमध्ये तक्रारकर्ता यांच्या बचत खाते क्र. 1568 मधील रक्कम प्रतिहप्ता रु.49,500/- याप्रमाणे एकूण 8 हप्त्यांमध्ये अदा करावयाची आहे.
2. अभिलेखावर दाखल तडजोडपत्राचे अवलोकन केले असता उभय पक्षांमध्ये परस्पर सामंजस्याने व समन्वयाने तडजोड झालेली आहे. तडजोडपत्रावर तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांची स्वाक्षरी आहे. असे दिसते की, उभयतांनी अटीदर्शक तडजोडपत्र तयार केलेले आहे.
3. विरुध्द पक्ष यांनी लेखी अर्जाद्वारे विनंती केली की, तडजोडीनुसार त्यांनी तक्रारकर्ता यांना 3 हप्ते दिलेले आहेत आणि ग्राहक तक्रार निकाली काढावी. त्यापृष्ठयर्थ त्यांनी खाते उतारा दाखल केला आहे.
4. तडजोडपत्रानुसार विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रक्कम अदा न केल्यास त्या-त्या देय तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने देय रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र राहतील, अशा निर्देशासह ग्राहक तक्रार निकाली काढणे न्यायोचित आहे. अंतिमत: खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) उभय पक्षांतील तडजोडपत्राच्या अधीन राहून ग्राहक तक्रार निकाली काढण्यात येते.
(2) उभय पक्षांतील तडजोडपत्रानुसार विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रक्कम अदा न केल्यास सदर अदेय रक्कम त्या-त्या देय तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने द्यावी.
(श्री. मुकुंद भ. सस्ते) (श्री. शशांक श. क्षीरसागर)
ज्येष्ठ सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-