जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
किरकोळ अर्ज क्रमांक : 7/2020.
श्री. संतोष नवनाथ लाड, वय 35 वर्षे, व्यवसाय : ड्रायव्हर,
रा. पारगांव, ता. वाशी, जि. उस्मानाबाद. अर्जदार
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, चोलामंडलम् इन्व्हेस्टमेंट अॅन्ड फायनान्स
कंपनी लि., शाखा उस्मानाबाद, बाराते कॉप्लेक्स, संभाजी चौक,
डी.आय.सी. रोड, आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या समोर,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.
(2) शाखा व्यवस्थापक, एच.डी.एफ.सी. लाईफ इन्शुरन्स प्रिमियम
इन्शुरन्स कंपनी, शाखा : उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (1) श्री. मुकुंद भगवान सस्ते, न्यायपीठ सदस्य
(2) श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य
अर्जदार यांचेतर्फे विधिज्ञ :- जी.एम. कांबळे
आदेश
(दि.4/1/2021)
श्री. मुकुंद भगवान सस्ते, न्यायपीठ सदस्य यांचे द्वारे (न्यायकक्षामध्ये) :-
1. अर्जदाराचे वकील हजर. विरुध्द पक्ष गैरहजर. अर्जदाराच्या वकिलाचा विलंब माफीच्या अर्जावर युक्तिवाद ऐकला. तक्रारकर्त्याच्या मृत्यूची तारीख 5/2/2020 असून त्याच्या नंतर त्याच्या असलेल्या विम्याच्या कार्यवाही संदर्भात दि.28/2/2020 रोजी ते कार्यालयात गेले असता त्यांना तक्रारकर्त्याच्या विम्याच्या संदर्भात मिळालेली सेवा ही निकृष्ठ दर्जाची व चुकीची असल्यामुळे व्यथित होऊन ही तक्रार दाखल केलेली दिसून येते. दि.5/2/2020 ही जरी वादोत्पत्तीचे कारण धरले तरी तक्रारही मुदतीत आहे, असे या न्याय-मंचाचे मत आहे. दाखल कागदपत्रांवरुन तक्रारकर्त्याच्या मृत्यूच्या तारखेची खातरजमा करुन घेतली. त्यामुळे तक्रार दाखल करताना विलंबच झालेला नाही, असे न्यायपिठाचे मत असून विलंब माफीचा अर्ज मंजूर करण्यात येतो.
(श्री. मुकुंद भ. सस्ते) (श्री. शशांक श. क्षीरसागर)
ज्येष्ठ सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-
(संविक/श्रु/4121)