Maharashtra

Satara

CC/20/177

पार्थ मरीप्पा् पोळके - Complainant(s)

Versus

मा व्यवस्थापक, न्यू् इंडीया एशोरन्सन कं लि. - Opp.Party(s)

H. B. Dhumal

28 Jun 2024

ORDER

Consumer Disputes Redressal
Commission, Satara
 
Complaint Case No. CC/20/177
( Date of Filing : 14 Sep 2020 )
 
1. पार्थ मरीप्पा् पोळके
पवित्र, शिवाजीनगर, गेंडामाळ, शाहुपुरी सातारा
सातारा
महाराष्ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मा व्यवस्थापक, न्यू् इंडीया एशोरन्सन कं लि.
सातारा मंडळ कार्यालय, जीवनतारा, पहिला मजला, कलेक्टर ऑफिस समोर, सातारा
मुंबई
महाराष्ट्र
2. . न्यू, इंडीया एशोरन्स कं लि. , मुख्य कार्यालय
87, एम जी रोड, फोर्ट मुंबई 1
मुंबई
महाराष्ट्र
3. 3. युसुफ गुलाब महंमद पटेल
भारत गॅस एजन्सीु जवळ, शिरवळ, ता. खंडाळा जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. BHARATI S. SOLAWANDE PRESIDENT
 HON'BLE MRS. ROHINI B. JADHAV MEMBER
 HON'BLE MS. MANISHA H. REPE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 28 Jun 2024
Final Order / Judgement

न्या य नि र्ण य

 

द्वारा मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्‍यक्ष

 

1.    प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.

 

2.    तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –

      जाबदार क्र.1 व 2 ही विमा व्‍यवसाय करणारी कंपनी आहे.  जाबदार क्र.3 हे नाममात्र जाबदार असून त्‍यांचेकडून तक्रारदार यांनी दि. 18/12/2018 ला वाहन क्र. एम.एच.11/बी.एच.9597 खरेदी केले आहे. सदर वाहनाचा विमा जाबदार यांचेकडे उतरविला असून पॉलिसी क्र. 15170031180100010214 असा आहे व सदरची पॉलिसी ही दि. 11/12/2019 पर्यंत वैध होती. सदर पॉलिसी ही जाबदार क्र.3 यांचे नावे आहे.  दि. 15/4/2019 रोजी सदर वाहनास अपघात झाला व त्‍यामध्‍ये वाहनाचे नुकसान झाले.  सदर बाबीची कल्‍पना तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांना दिलेनंतर त्‍यांनी त्‍याचदिवशी सर्व्‍हे पूर्ण केला.  त्‍यांचे सूचनेनुसार तक्रारदार यांनी वाहन दुरुस्‍तीसाठी साई सर्व्हिसेस, वाढे फाटा, सातारा येथे पाठविले.  त्‍यांनी एकूण रक्‍कम रु.1,90,201/- चे दुरुस्‍तीचे कोटेशन दिले.  तक्रारदार यांनी सदरचे कोटेशन जाबदार कंपनीचे कार्यालयात दिले. परंतु जाबदार यांनी नुकसान भरपाई देणेस नकार दिला.  म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.  सबब, तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून नुकसान भरपाई म्‍हणून रक्कम रु.1,90,201/- मिळावेत, सदर रकमेवर द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज मिळावे, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/-, व अर्जाचा खर्च जाबदारकडून मिळावेत अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे. 

 

3.    तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत ट्रान्‍स्‍फर सर्टिफिकेट, विमा पॉलिसी सर्टिफिकेट, कोटेशन, स्‍मरणपत्र, तक्रारदार यांनी जाबदार यांना दिलेली नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे.

 

4.    जाबदार क्र.1 व 2 यांनी याकामी हजर होवून म्हणणे दाखल केले. जाबदार क्र.1 व 2 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये, तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथने परिच्छेदनिहाय नाकारली आहेत. तक्रारदार यांनी वादातील वाहनाचा विमा जाबदार यांचेकडे कधीही उतरविलेला नव्‍हता.  त्‍यामुळे तक्रारदार व जाबदार यांचेमध्‍ये ग्राहक व सेवा देणार असे नाते नाही. वादातील वाहनाचे रजिस्‍ट्रेशन सर्टि‍फिकेटवर दि.18/12/2018 रोजी तक्रारदाराचे नावाची नोंद मालक म्‍हणून झालेवर तक्रारादाराने त्‍याची माहिती जाबदार कंपनीस कळविली नव्‍हती.  तसेच सदर कारची विमा पॉलिसी तक्रारदाराचे नावावर करण्‍यासाठी तक्रारदाराने आवश्‍यक ती कायदेशीर पूर्तता केली नव्‍हती.  त्‍यामुळे अपघातादिवशी तक्रारदार व जाबदार विमा कंपनीमध्‍ये कोणताही पॉलिसी करार अस्तित्‍वात नव्‍हता.  तसेच वाहनाची मालकी हस्‍तांतर झालेमुळे जाबदार क्र.3 युसुफ पटेल व जाबदार विमा कंपनी यांचेतील विमा करार संपुष्‍टात आला आहे.  वादातील वाहनास अपघात झाल्‍यानंतर जाबदार विमा कंपनीने लालासाहेब कुदळे सर्व्‍हेअर यांचेकडून वाहनाचा सर्व्‍हे करुन घेतला.  तक्रारदारांनी जाबदार क्र.3 यांचे नावे मोटर क्‍लेम फॉर्म तक्रारदाराचे सहीने जाबदार कंपनीकडे दिला आहे.  तथापि त्‍यासोबत आवश्‍यक ते कागदपत्रे जाबदार कंपनीस दिलेली नाहीत.  तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक नसल्‍याने जाबदार कंपनीकडून सेवेत त्रुटी राहण्‍याचा प्रश्‍न उपस्थित होत नाही.   श्री कुदळे यांचे फायनल सर्व्‍हे रिपोर्टप्रमाणे वाहनाचे नुकसान हे सॅल्‍वेज रु.2,459/- वजा जाता रु.67,000/- इतके झाले आहे.  सबब, जाबदारांनी सेवेत कोणतीही त्रुटी केली नसल्‍याने तक्रारअर्ज फेटाळणेत यावा अशी मागणी जाबदार यांनी केली आहे.

 

5.    जाबदार क.1 व 2 विमा कंपनीने याकामी पुरावा शपथपत्र, सर्व्‍हेअर श्री कुदळे यांचे शपथपत्र, कागद यादीसोबत विमा पॉलिसी, तक्रारदार यांनी जाबदार यांना दिलेला क्‍लेम फॉर्म, श्री कुदळे यांचा स्‍पॉट सर्व्‍हे रिपोर्ट व फायनल सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केला आहे.

     

6.    जाबदार क्र.3 यांनी याकामी म्‍हणणे दाखल केले असून तक्रारदार यांनी त्‍यांचेकडून वादातील वाहन खरेदी केले आहे व विमा पॉलिसी ही जाबदार क्र.3 यांचेच नावावर आहे ही बाब मान्‍य केली आहे.  तक्रारदारांनी वाहनास अपघात झाल्‍याचे तसेच त्‍याचे दुरुस्‍तीसाठी रु.1,90,201/- इतका खर्च येणार आहे हे तक्रारदारांनी जाबदार क्र.3 यांना कळविले होते.  तक्रारदार यांनी जाबदार क्र.3 यांना पाठविलेली नोटीस जाबदार क्र.3 यांना मिळालेली नाही.  तक्रारदाराची तक्रार रास्‍त व योग्‍य असून ती जाबदार क्र.3 यांना मान्‍य आहे.  तक्रारदाराची तक्रारअर्जातील कथने योग्‍य आहेत असे जाबदार क्र.3 यांनी कथन केले आहे. 

     

7.    तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व पुरावा शपथपत्र, तसेच जाबदार क्र.1 ते 3 यांचे म्हणणे, शपथपत्र व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांचा युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात. 

 

.क्र.

मुद्दे

उत्तरे

1

तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ?

होय.

2

जाबदार विमा कंपनीने तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ?

होय.

3

तक्रारदार हे जाबदार विमा कंपनीकडून विमा रक्कम मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ?

होय.

4

अंतिम आदेश काय ?

खालीलप्रमाणे

                                         

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र.1

 

8.    तक्रारदार यांनी दि.18/12/2018 रोजी जाबदार क्र.3 यांचेकडून वाहन क्र. एम.एच.11/बी.एच.9597 खरेदी केले.  सदर वाहनाचा विमा मूळ मालक जाबदार क्र.3 यांनी जाबदार कंपनीकडे उतरविलेला होता. सदर वाहनाचा विमा जाबदार यांचेकडे उतरविला असून पॉलिसी क्र. 15170031180100010214 असा आहे व सदरची पॉलिसी ही दि. 11/12/2019 पर्यंत वैध होती. सदर पॉलिसी ही जाबदार क्र.3 यांचे नावे आहे.  सबब, जाबदार क्र.3 यांनी जाबदार क्र.1 यांचेकडून विमा संरक्षणाची सेवा घेतली असल्‍यामुळे आणि तक्रारदार हे वाहन खरेदी केल्‍यानंतर सदर पॉलिसीचे लाभधारक असल्‍यामुळे तक्रारदार हे “ग्राहक” या संज्ञेत येतात आणि त्‍यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्‍तर  हा आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2

 

9.    जाबदार क्र.1 व 2 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये असे कथन केले आहे की, वादातील वाहनाचे रजिस्‍ट्रेशन सर्टि‍फिकेटवर दि.18/12/2018 रोजी तक्रारदारचे नावाची नोंद मालक म्‍हणून झालेवर तक्रारदाराने त्‍याची माहिती जाबदार कंपनीस कळविली नव्‍हती.  तसेच सदर वाहनाची विमा पॉलिसी तक्रारदाराचे नावावर करण्‍यासाठी तक्रारदाराने आवश्‍यक ती कायदेशीर पूर्तता केली नव्‍हती.  त्‍यामुळे अपघातादिवशी तक्रारदार व जाबदार विमा कंपनीमध्‍ये कोणताही पॉलिसी करार अस्तित्‍वात नव्‍हता. सबब, जाबदार कंपनी विमा रक्‍कम देय लागत नाहीत असे जाबदार विमा कंपनीचे कथन आहे.

 

10.   भारतीय मोटार प्रशुल्‍कच्‍या नियमावलीचे अवलोकन करता त्‍यातील जीआर-17 नुसार “On transfer of ownership, the liability only covers either under a liability only policy or under a package policy is deemed to have transferred in favour of the person to whom the motor vehicle is transferred with effect from the date of transfer”.  सबब, सदर नियमानुसार वाहनधारकाचे नांवे ज्‍या दिवशी वाहनाची मालकी हस्‍तांतरीत झाली त्‍यादिवशी विमा पॉलिसी हस्‍तांतरीत झाली असे गृहित धरण्‍यात येते.  प्रस्‍तुत कामात तक्रारदाराचे नावे वादातील वाहनाची मालकी दि. 18/12/2018 रोजी हस्‍तांतर होवून त्‍यांचे नाव आर.टी.ओ. यांचे रेकॉर्डसदरी मालक म्‍हणून नोंद झाल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येत आहे.  सबब, भारतीय मोटार प्रशुल्‍क नियमावलीच्‍या जीआर-17 मधील गृहितकानुसार वादातील कारची मूळ मालक जाबदार क्र.3 यांचे नावाची जाबदार कंपनीची पॉलिसी दि. 18/12/2018 रोजी तक्रारदार यांचे नावे हस्‍तांतरण झाली असे मानण्‍यात येते. त्‍यामुळे अपघाताचेवेळी तक्रारदाराचे नावे विमा पॉलिसी हस्‍तांतरण झाली असल्‍यामुळे तक्रारदार यांचा सदर वाहनामध्‍ये insurable interest होता या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, तक्रारदारांची अपघाताचे वेळी विमा पॉलिसी वैध असताना सुध्‍दा जाबदारांनी तक्रारदारांचा विमादावा नाकारुन सेवेत गंभीर त्रुटी निर्माण केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात आले आहे.

 

11.   तक्रारदारांनी याकामी खालील न्‍यायनिवाडे दाखल केले आहेत.

  1. 2020 SAR (Civ) 551

Canara Bank Vs. M/s United India Insurance Co.

Held – Consumer includes not only the person who has hired or availed of the services but also includes any beneficiary of such services.  Not necessary that beneficiaries should be parties to the contract of insurance.

  1. MACA No. 2585/16 decided on 27/11/2022

Kerala High Court

Reliance Insurance Company Vs. Annamma Raju @ Bincy

Held – It is clear that, as far as the non-compliance with Section 157(2) is concerned, it will have no consequence as regards the liability of the insurance company to indemnify the insured in respect of the claims arising from the victims of the motor vehicle accident.  In this case, the accident occurred after the transfer of ownership is completed by following the provisions of the Motor Vehicles Act and therefore, the deemed transfer of policy had occurred before the accident.

      सदरचे निवाडे प्रस्‍तुत प्रकरणास लागू होतात असे या आयोगाचे मत आहे.

 

मुद्दा क्र.3

 

12.   तक्रारदाराने साई सर्व्हिसेस यांनी वाहन दुरुस्‍तीसाठी दिलेले कोटेशन दाखल केले आहे.  सदर कोटेशननुसार वाहन दुरुस्‍तीची रक्‍कम रु. 1,90,201/- इतकी नमूद केली आहे.  तक्रारदारांनी सदरची रक्‍कम रु. 1,90,201/- ची मागणी वाहनाचे नुकसान भरपाईपोटी केली आहे.  तथापि जाबदार क्र.1 व 2 यांनी याकामी श्री लालासाहेब कुदळे यांचा फायनल सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केला आहे.  सदर रिपोर्टनुसार वाहनाचे नुकसान हे सॅल्‍वेज रु.2,459/- वजा जाता रु.67,000/- इतके सर्व्‍हेअर यांनी निश्चित केले आहे. जाबदार क्र.1 व 2 यांनी सदरचे सर्व्‍हेअर श्री कुदळे यांचे शपथपत्रही दाखल केले आहे.  सबब, सर्व्‍हेअर श्री कुदळे यांचे फायनल सर्व्‍हे रिपोर्टचा विचार करता तक्रारदार हे जाबदार क्र.1 व 2 विमा कंपनीकडून रक्कम रु.67,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा दावा नाकारले तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदारास मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  तसेच जाबदार क्र.1 व 2 यांनी विमादावा नाकारल्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच या आयोगात तक्रारअर्ज दाखल करावा लागला.  या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब आदेश.

 

आदेश

 

  1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
  2. जाबदार क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारदारास विमादाव्‍यापोटी रक्कम रु.67,000/- अदा करावी तसेच सदर रकमेवर विमादावा नाकारले तारखेपासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
  3. जाबदार क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
  4. सदर आदेशाचे अनुपालन जाबदार क्र.1 व 2 विमा कंपनीने निकालाची प्रत मिळालेपासून 45 दिवसांचे आत करावे.
  5. जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.

सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.

 
 
[HON'BLE MRS. BHARATI S. SOLAWANDE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. ROHINI B. JADHAV]
MEMBER
 
 
[HON'BLE MS. MANISHA H. REPE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.