जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 22/2020. तक्रार दाखल दिनांक : 03/02/2020. तक्रार निर्णय दिनांक : 18/04/2022.
कालावधी : 02 वर्षे 02 महिने 15 दिवस
चंद्रकला किशनराव वायचळे, वय 80 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. औसा रोड, लातूर, रा. आदर्श कॉलनी, औसा रोड, लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
मानसी मायक्रो फायनान्स लिमिटेड, लातूर तर्फे भागीदार :-
(1) भुजंग दिगंबर पवार, वय 41 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. लातूर.
(2) नामदेव रामराव गड्डीमे, वय 33 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. लातूर.
रा. लाईफ स्टाईल बिल्डींग, राजीव गांधी चौक, लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- मंगेश एस. महिंद्रकर
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांच्याकडे गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह परत मिळावी, याकरिता तक्रारकर्ती यांनी प्रस्तुत ग्राहक तक्रार जिल्हा आयोगामध्ये दाखल केलेली आहे.
(2) जिल्हा आयोगाद्वारे दि.25/2/2020 रोजी प्रस्तुत ग्राहक तक्रार नोंद करुन विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठविण्याचे आदेश करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे जिल्हा आयोगाद्वारे विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्यात आले. दि.12/2/2020 पासून विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र प्राप्त झाल्याबाबत अहवाल अप्राप्त आहे. विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणीसंबंधी आवश्यक कार्यवाही किंवा पूर्तता करण्यासंबंधी तक्रारकर्ती यांना उचित संधी दिलेली आहे. परंतु तक्रारकर्ती व त्यांचे विधिज्ञ जिल्हा आयोगापुढे सातत्याने अनुपस्थित आहेत. हे सत्य आहे की, ग्राहक तक्रारीचा गुणवत्तेवर न्यायनिर्णय होण्याकरिता व नैसर्गिक न्याय तत्वानुसार प्रतिपक्षाची बाजू मांडली जाणे अत्यावश्यक आहे. परंतु प्रस्तुत प्रकरणामध्ये विरुध्द पक्ष यांना जिल्हा आयोगाच्या सूचनापत्राची बजावणी झाल्याचे निदर्शनास येत नाही. त्यासंबंधी योग्य पावले उचलण्याकरिता किंवा पूर्तता करण्यासाठी तक्रारकर्ती यांना स्वारस्य नाही, असे निदर्शनास येते. अशा स्थितीमध्ये प्रस्तुत ग्राहक तक्रार गुणवत्तेवर निर्णयीत करता येणार नाही. तसेच जिल्हा आयोगाद्वारे ग्राहक तक्रार निर्णयीत करण्यासाठी कालमर्यादा निश्चित केलेली आहे. उक्त विवेचनाअंती तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त आहे. अंतिमत: खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-