जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 138/2021. आदेश दिनांक : 25/05/2022.
नरसिंग पिता दत्तू चपटे,
रा. आनंद नगर, निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) छत्रपती बोअरवेल एजन्सी, प्रोप्रा. मोहन कदम सावरीकर,
वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. नाथ कॉम्प्लेक्स,
औराद शहाजानी, ता. निलंगा, जि. लातूर.
(2) सोमासुन्दरम जी. (के.ए.10 / एम.4578 वाहनाचे चालक व मालक),
वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. कर्नाटक, ह.मु. नाथ कॉम्प्लेक्स,
औराद शहाजानी, ता. निलंगा, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- रफीक एम. शेख
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांनी सदोष बोअरवेल घेतल्यामुळे त्याकरिता स्वीकारलेले मुल्य व नुकसान भरपाई देणे आणि बोअरवेल दुरुस्त करुन देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रार नोंद करण्यात आल्यानंतर ग्राहक तक्रारीमध्ये असणा-या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तक्रारकर्ता यांना उचित संधी देण्यात आली. परंतु तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ सातत्याने अनुपस्थित राहिले. त्रुटींची पूर्तता झाल्याशिवाय ग्राहक तक्रार दाखल करुन घेणे अशक्य आहे. ग्राहक तक्रार दाखल करुन घेण्यासाठी त्रुटींची पूर्तता करण्यासंबंधी तक्रारकर्ता यांना स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रार कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-